राष्ट्रवादीत फूट; देवी सरस्वतीचा अवमान करणाऱ्या भुजबळांना रोहित पवारांनी सुनावले

121

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता वैचारिक फूट पडत असल्याचे चित्र समोर आले आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार स्वतःला नास्तिक समजतात म्हणून छगन भुजबळ, अमोल मिटकरी यांच्या सारखे नेते हिंदू धर्मातील रूढी-परंपरा आणि देवतांचा अवमान करत असतात, परंतु अशा हिंदुद्वेषी विचारांना विरोध राष्ट्रवादीतीलच नेते मंडळी करू लागली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत पडलेली वैचारिक फूट उघडपणे दिसत आहे.

काय म्हणाले होते छगन भुजबळ? 

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा देवी सरस्वतीचा अवमान करणारी वक्तव्ये केली. सरस्वतीची पूजा करण्यापेक्षा शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, भाऊराव पाटील यांची पूजा करा. बहुजन समाजाला शिक्षणाची कवाडे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी उघडली. सावित्रीबाईंमुळे महिलांना शिक्षण मिळाले. सरस्वती देवीने किती शाळा काढल्या? किती लोकांना देवीने शिक्षण दिले? जर त्यांनी शिक्षण दिले तर मग महात्मा फुलेंना शिक्षणविषयक पाऊल का टाकाले लागले? असे सवाल भुजबळ यांनी केला होता. याचे तीव्र पडसाद उमटले.

(हेही वाचा आफताब तर निघाला तालिबानी जिहादी…)

रोहित पवारांनी सुनावले

या संदर्भात जेव्हा माध्यमांनी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी लहान तोंडी मोठा घास घेत आहे, अशी विधाने टाळली पाहिजेत, देवी देवतांचा अवमान होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे म्हटले. त्यावर तिळपापड झालेल्या भुजबळांनी थेट रोहित पवारांचे अर्थात शरद पवारांचे घराणे बाहेर काढले. मी फार काही बोलणार नाही. पण रोहित पवार यांनी अभ्यास करावा. कारण त्यांच्या घराण्याला सत्यशोधक विचारांचा मोठा वारसा लाभलेला आहे. त्यांचे आजोबा, पणजोबा हे सर्व सत्यशोधक विचारांच्या मुशीतून तयार झालेले लोक आहेत. हळूहळू त्यांच्या सारे लक्षात येईल, अशा शब्दात भुजबळांनी रोहित पवारांना खडसावले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.