Madhya Pradesh Congress : मध्य प्रदेश काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ‘खेळाचा बाजार’

शिवाय, निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसकडून देशाचे प्रतिमाभंजन सुरू असल्याबाबत नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे.

138
Madhya Pradesh Congress : मध्य प्रदेश काँग्रेसच्या जाहीरनाम्यात 'खेळाचा बाजार'
Madhya Pradesh Congress : मध्य प्रदेश काँग्रेसच्या जाहीरनाम्यात 'खेळाचा बाजार'

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, त्यात खेळाचा बाजार मांडण्यात आल्याने क्रीडा प्रेमींनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. शिवाय, निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसकडून देशाचे प्रतिमाभंजन सुरू असल्याबाबत नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे. (Madhya Pradesh Congress)

येत्या नोव्हेंबर महिन्यात मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, त्यातून आश्वासनांची खैरात वाटण्यात आली आहे. १०१ आश्वासनांचा समावेश असलेल्या या जाहीरनाम्याला ‘प्रॉमिसरी नोट’ असे नाव देण्यात आले आहे. आमचे सरकार आल्यास ‘मेडल आणा, करोडपती बना’, अशी योजना सुरू केली जाईल, असे काँग्रेसने म्हटले आहे. मात्र, त्यावर क्रीडाप्रेमींनी आक्षेप नोंदवला आहे. (Madhya Pradesh Congress)

(हेही वाचा – Antilia Bomb blast : मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी नरेश गौरची याचिका एनआयएने फेटाळली)

‘मेडल आणा, करोडपती बना’, असे सांगणे म्हणजे खेळाचा बाजार मांडण्यासारखे आहे. भारताचे खेळाडू देशासाठी नव्हे, तर करोडपती होण्यासाठी खेळतात, असा संदेश या माध्यमातून जगभरात पोहोचेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नाचक्की होईल. त्यामुळे देशाचे प्रतिमाभंजन होईल, असे कृत्य काँग्रेसने करू नये, अशी मागणी क्रीडाप्रेमींकडून केली जात आहे. (Madhya Pradesh Congress)

काँग्रेसचा जाहीरनामा खोटा – शिवराज

‘काँग्रेसचा हा जाहीरनामा खोटा आहे. पाच वर्षांपूर्वी काँग्रेसने ९०० हून अधिक आश्वासने दिली होती. पण, त्यातील एकही पूर्ण केले नाही. पुन्हा एकदा खोटी आश्वासने देण्यात आली आहेत. यावर नागरिक विश्वास ठेवणार नाहीत. नागरिकांना माहिती आहे की, भाजपा जे बोलते, ते करून दाखवते,’ अशी प्रतिक्रिया मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. (Madhya Pradesh Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.