कोळीवाड्यांच्या जागेवर SRA होणार नाहीच, कोळीवाड्यांना वाढीव FSI देणार – उपमुख्यमंत्री

165

मुंबईतील ४७ पैकी ३२ कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण झाले आहे, मात्र तरीही ज्या कोळीवाड्यांचे अजून सीमांकन झाले नाही, तिथे SRA प्रकल्प आणले जात आहेत, असे दिसून आले आहे. त्यामुळे ज्या कोळीवाड्यांचे सीमांकन झाले नाही त्या कोळीवाड्यांच्या जागेवर SRA प्रकल्पाला मान्यता दिली जाणार नाही, तसेच कोळीवाड्यांच्या विकासासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली ( DCR) तयार करण्यात आली आहे, त्यानुसार त्यांना वाढीव FSI दिला जाणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

( हेही वाचा : प्रतापगडाखालील अफझलखानाच्या थडग्याभोवती अतिक्रमण हटवण्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल )

शिवडी कोळीवाडा येथील झोपडपट्टी पुनर्विकास योजना रद्द करण्याबाबतच्या तारांकित प्रश्नावर उपमुख्यमंत्री उत्तर देत होते. यावेळी आमदार सचिन अहिर यांनी मुंबईत वर्सोवा, कुलाबा येथील कोळीवाड्यात SRA च्या अतिक्रमणाचा विषय येत होता आता तो सायन कोळीवाड्यातही निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सरकार म्हणते तसे मुंबईतील सर्व कोळीवाड्यांचे सीमांकन झाले नाही, असे सांगितले. तर आमदार भाऊ जगताप यांनी मुंबईत ४७ कोळीवाडे आहेत, तसेच त्यांचे गावठाण आहेत, कोळी बांधव हा मुंबईचा मालक आहे, त्यांचे अधिकार इंग्रज आणि पोर्तुगीज यांनी सुरक्षित ठेवले होते, तसे आजच्या सरकारनेही त्यांचे अधिकार शाबूत ठेवले पाहिजेत, असे म्हटले.

कोळीवाड्यांचे अधिकार शाबूत ठेवणार

मुंबईतील कोळीवाडे हे मुंबईचे वैभव आहे, त्यांचे अधिकार कदापि कमी केले जाणार नाहीत, DC रुल अंतर्गत जेवढे म्हणून शक्य आहे तेवढे त्यांचे अधिकार शाबूत ठेवले जातील. पण कोळीवाड्यांच्या बाजूला असलेल्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणे गरजेचे आहे, त्यामुळे तिथे SRA आणणे गरजेचे आहे, अशावेळी त्या कोळीवाड्यांचे मत समजून घेतले जाईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.