यासीन मलिकने न्यायालयात दिली कबुली; म्हणाला, ‘होय, मी दहशतवादी…’

110

दहशतवादी फंडिंग प्रकरणात फुटीरतावादी नेता यासिन मलिक याने दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. यासीनने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर विशेष न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी 19 मे रोजी त्याचा निकाल देण्याचे आदेश दिले. मलिक याच्यावर दिल्ली उच्च न्यायालयात बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA) यासह दहशतवादाशी संबंधित अनेक खटले दाखल आहेत.

(हेही वाचा – राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी!)

अशी पार पडली सुनावणी

दरम्यान, 16 मार्च रोजी न्यायालयाने हाफिज सईद, सय्यद सलाहुद्दीन, यासीन मलिक, शब्बीर शाह आणि मसरत आलम, रशीद इंजिनियर, जहूर अहमद वताली, बिट्टा कराटे, आफताफ अहमद शाह, अवतार अहम शाह, नईम खान, बशीर अहमद यांच्यासह बट उर्फ ​​पीर सैफुल्ला या इतर आरोपींवर आरोप निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले. एनआयएच्या मते, लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिदीन, जेकेएलएफ, जैश-ए-मोहम्मद यांसारख्या संघटनांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या सहकार्याने जम्मू-काश्मीरमध्ये नागरिक आणि सुरक्षा दलांवर हल्ले आणि हिंसाचार घडवून आणला. 1993 मध्ये फुटीरतावादी कारवाया करण्यासाठी ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सची स्थापना करण्यात आली.

(हेही वाचा – कोरोनानंतर भारतात Tomato flu चं थैमान! ही आहेत लक्षणे)

या प्रकरणांमध्ये यासीनचा सहभाग 

एनआयएच्या मते, हाफिद सईदने हुर्रियत कॉन्फरन्सच्या नेत्यांशी संगनमत करून दहशतवादी कारवाया करण्यासाठी हवाला आणि इतर माध्यमांद्वारे पैशांचा व्यवहार केला. त्यांनी हा पैसा खोऱ्यात अशांतता निर्माण करण्यासाठी, सुरक्षा दलांवर हल्ला करण्यासाठी, शाळा जाळण्यासाठी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यासाठी वापरला. गृह मंत्रालयाला माहिती मिळाल्यानंतर एनआयएने विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यासीन मलिकचे गुन्हे पाहता त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, म्हणजेच त्याला संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढावे लागणार असल्याची शक्यता आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.