SSC & HSC Board Exam 2025 : दाहवी- बारावीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख; शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

43
SSC & HSC Board Exam 2025 : दाहवी- बारावीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख; शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
SSC & HSC Board Exam 2025 : दाहवी- बारावीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख; शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Board Exam) घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च 2025 (SSC & HSC Board Exam 2025 ) च्या दाहवी- बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्राबाबत (Hall Ticket 2025) एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या (SSC) (HSC) हॉल तिकिटावर आता विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्याचे समोर आले आहे. हॉल तिकीटवर केल्या गेलेल्या जात प्रवर्गाच्या उल्लेखानंतर शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षकांकडून बोर्डाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (SSC & HSC Board Exam 2025 )

हेही वाचा-Mahakumbh 2025 : महाकुंभात स्फोटाची धमकी; 18 संशयित ताब्यात, संरक्षण मंत्री लष्कराच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार

एकीकडे शाळेच्या दाखल्यावर जातीची नोंद हटवण्याची मागणी होत असताना बोर्डाकडून जात प्रवर्ग हॉल तिकीट वर दिला जात असल्याचं समोर आले आहे. यंदाचे वर्षी दहावी, बारावी बोर्डाच्या हॉल तिकीटमध्ये काही बदल करण्यात आले आहेत आणि त्यामध्येच विद्यार्थी कोणत्या जातीच्या प्रवर्गात मोडतो हे स्पष्ट हॉल तिकीटवर असलेल्या रकान्यात दिसत आहे. (SSC & HSC Board Exam 2025 )

हेही वाचा-Bangladeshi Infiltrators : आता ग्रामीण भागातही बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी; सहा बांगलादेशी महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट वितरित करायला सुरुवात झाली असून दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट सोमवारपासून वितरित केले जाणार आहेत. कागदपत्रावर जातीची नोंद चुकली असेल तर पालकांना शिक्षणाधिकारी उपसंचालक कार्यालयातून योग्य ती कागदपत्रे सादर करून तो बदल करून घेता येईल. विद्यार्थ्यांची जातीची नोंद शाळेमध्ये योग्य झाली आहे हे कळण्यासाठी हॉल तिकीट वर जात प्रवर्ग दिला असल्याचा सांगितलं गेलंय. सामाजिक न्याय विभागाला विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देता यावा, यासाठी दरवेळी जात निहाय आकडेवारी विद्यार्थ्यांची द्यावी लागते. त्यासाठी हॉल तिकिटावर योग्य ती जात प्रवर्ग कळल्यास त्याचा उपयोग होईल, असं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. (SSC & HSC Board Exam 2025 )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.