एसटी अपघात : एकनाथ शिंदे यांनी केली मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

117
मध्य प्रदेशमधील नर्मदा नदीमध्ये सोमवारी सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे आणि जखमींवर तातडीने उपचारासाठी मध्य प्रदेशच्या जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिले.
अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी संवाद साधून, खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली. या दुर्घटनेसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनादेखील मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या असून, वाचलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.  दरम्यान, मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्द करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या असून, मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.