ऑक्टोबर महिन्यापासून एसटी कर्मचा-यांचे आंदोलन सुरु आहे. एसटीचे राज्यात विलीनीकरण व्हावे या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. आझाद मैदानात कर्मचारी आंदोलन करत आहेत. या मैदानात सुरु असलेल्या एसटी कर्मचा-यांना मुलभूत सुविधाही मिळत नसल्याने आता कर्मचारी आक्रमक झाले आहेत. कर्मचा-यांनी सोमवारी मुंबई महानगरपालिकेसमोर तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे बोंबाबोंब आंदोलन सुरु केले आहे. पिण्याचे पाणी तसेच शौचालय नसल्यामुळे हे आंदोलन केले जात आहे.
आंदोलकांना कसे आवरायचे
गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्याप्रमाणे त्यांना सुविधा मिळत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे. पोलिसांसमोर आंदलोकांना कसे आवरायचे हा प्रश्न आहे. पोलीस आता नेमकी कोणती भूमिका बजावणार आहेत, पाहावे लागणार आहे. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था अडचणीत येऊ नये म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत.
दिडशे लोकांनी आत्महत्या केली तरीही…
सोमवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच कर्मचाऱ्यांनी मुंबई पालिकेसमोर आंदोलन सुरु केले आहे. कर्मचाऱ्यांनी रस्ते जाम केले आहेत. या पाच महिन्यांच्या काळात आमच्या दिडशे लोकांनी जीवन संपवले आहे. तरीदेखील सरकारने यावर निर्णय घेतला नसल्याच्या प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिल्या. आंदोलनस्थळाकडे मुंबई पालिका पूर्ण दुर्लक्ष करत आहे. आंदोनस्थळी शौचालयाची सुविधा नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. सरकारने इथे काय केले? असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. वारंवार मागण्या करुनही आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
( हेही वाचा: राज ठाकरेंसाठी नारायण राणेंकडून ३ ट्विट )
प्रशासनासमोर आव्हान
मुंबईच्या सीएसएमटी स्टेशनबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी टॉयलेट आंदोलन सुरू केले आहे. शेकडो एसटी कर्मचारी रस्त्यावर आंदोलनाला बसले आहेत. भर रस्त्यात एसटी कर्मचारी शौचास बसल्याने पोलिसांसह प्रशासनाची झोप उडाली होती. आझाद मैदान परिसरात शौचाची सोय, अंघोळीची सोय नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारला कुठे शौचास जायचे असा सवाल केला आहे.
Join Our WhatsApp Community