Stamp Duty: पालकांसह विद्यार्थ्यांना दिलासा; प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ

94

Stamp Duty : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे मुद्रांक शुल्क माफ केल्याने विद्यार्थ्यांचा आर्थिक ताण आता हलका होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Revenue Minister Chandrasekhar Bawankule) यांनी या निर्णयाची घोषणा केली. (Stamp Duty)

नक्की निर्णय काय?
राज्यात कोणतंही शासकीय काम असो किंवा सरकारी परीक्षेचा अर्ज (Examination Form), नागरिकांना त्या कामासाठी जात पडताळणी, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र अशी प्रतिज्ञापत्रके जोडावी लागतात. या प्रतिज्ञापत्रकांसोबत एक 500 रुपयांचे मुद्रांकशुल्कही भरावे लागते. विशेषत: दहावी बारावीच्या निकालानंतर (Board Exam Result) अनेक विद्यार्थी आणि पालकांचा ही सर्व प्रमाणपत्र लागतात. या प्रतिज्ञापत्रकांसाठी लागणारा साधारण 3-4 हजार रुपयांचा खर्च आता वाचणार आहे. आता या प्रतिज्ञापत्रकांसोबत भरावे लागणारे 500 रुपयांची स्टॅम्प ड्यूटी आता माफ करण्यात आली आहे.

(हेही वाचा – शिमग्यापूर्वी Konkan Railway गडबडली; ‘या’कारणांमुळे रेल्वेची सेवा अंशतः रद्द)

कोणत्या प्रतिज्ञापत्रांसाठी निर्णय लागू?
जात पडताळणी प्रमाणपत्र,उत्पन्नाचा दाखला,रहिवासी प्रमाणपत्र,नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासह इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे.या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत.या सर्व प्रमाणपत्रांना जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (500 stamp duty) आता जोडावे लागणार नाही. त्या ऐवजी एका साध्या कागदावर ‘सेल्फ अटेस्टेड’ (Self attested) अर्ज लिहून ही प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळवता येतील.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.