अर्ज भरून प्रचाराला सुरुवात ; Adv Ujjwal Nikam यांचे विरोधकांना थेट आव्हान 

माझ्या विरोधात कोण उभे राहते हे माझ्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे नाही. दरम्यान पत्रकार परिषद घेत विरोधकांना खडसावले.

172
अर्ज भरून प्रचाराला सुरुवात ; Adv Ujjwal Nikam यांचे विरोधकांना थेट आव्हान 

मुंबई उत्तर मध्य लोकसभा (Mumbai North Central Lok Sabha) मतदारसंघात महायुतीकडून ॲड उज्ज्वल निकम (Adv Ujjwal Nikam) यांना लोकसभा उमेदवारी दिली असून, त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, विरोधकांकडून जे काही चुकीचे बोलले जात आहे. त्या संदर्भात महायुतीचे उमेदवार ॲड उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांना चांगलेच धारेवर धरले.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील नऊ खासदारांची तिकीटे कापली! पण का? काय होती त्या मागची कारणे? वाचा)

माझ्या उमेदवारीचा त्यांनी धसका घेतला – निकम 

पत्रकार परिषदमध्ये बोलताना निकम म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक माझ्यासाठी नवीन असली तरी तरी भाजपासह युतीचे आमदार यांच्यासह सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की, माझा राजकारणातील जन्म चार-पाच दिवसांचा असताना, विरोधकांकडून जे काही बोलले जाते, यावरून माझ्या उमेदवारीचा त्यांनी धसका घेतला आहे. एवढे मात्र अनुमान काढू शकतो, असे उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषदमध्ये स्पष्ट केले.

(हेही वाचा – Hemant Soren: हेमंत सोरेन यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळली)

जनता २० मे रोजी या आरोपांना चोखपणे उत्तर देईल – निकम 

ॲड उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी संवाद (Adv Ujjwal Nikam Press Conference) साधला. यावेळी विरोधकांच्या आरोपांवर थेट उत्तर दिली. उमेदवारी अर्ज भरताना जनतेचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. असा प्रतिसाद मला वकिली व्यवसायातही मिळाला नाही. उमेदवारी अर्ज भरायच्या आधी जी रॅली झाली, त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हेही सहभागी झाली. दोघांनी मला शुभेच्छा दिल्या, असे ॲड उज्ज्वल निकम म्हणाले. तसेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Congress leader Vijay Wadettiwar) यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. अशा आरोपांकडे मी अजिबात लक्ष देत नाही. ही जनता २० मे रोजी या आरोपांना चोखपणे उत्तर देईल, असे निकम म्हणाले.  

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.