राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक शुक्रवारी, (५ जुलै) पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये राज्य सरकारने नुकतंच मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या वाढावी, या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठीच घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने आता मुलींसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यातील EWS (ईडब्ल्यूएस), एसईबीसी (SEBC) व ओबीसी विद्यार्थिनींसाठी (OBC) हा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना शिक्षणासाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क ५0% ऐवजी आता १00% शुल्क माफ केले जाणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना याचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पातील घोषणांच्या अंमलबजावीसह अन्य महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई-रिक्षा उपलब्ध करून देणे, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय, काजू उत्पादक शेतक-यांना अनुदान, नवीन पर्यटन धोरणांसह इतर अनेक विषयांवर कॅबिनेट बैठकीत चर्चा होणार आहे.
(हेही वाचा – New Chess Star : भारतीय वंशाची बोधना शिवानंदन नवव्या वर्षी ग्रेट ब्रिटनसाठी खेळणार)
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सभापती निवडीबाबतही चर्चा?
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सभापती निवडीबाबतही चर्चा झाल्याची शक्यता आहे. विधान परिषदेचं सभापती पद सध्या रिक्त आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे या सध्या कार्यवाहू सभापती आहे. आता सभापतीच्या निवडीबाबतही लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. सभापती निवडीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करावी लागते आणि त्यानंतर निर्णय घ्यावा लागतो. सभापतीपदाच्या उमेदवारीवर भाजपा ठाम आहे. भाजपाकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे आणि निरंजन डावखरे यांच्या नावाची चर्चा आहे, अशी भाजपाच्या वरिष्ठ मंत्र्याची माहिती आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community