State Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर ‘क्रॉस वोटिंग’चे सावट!

119
State Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर ‘क्रॉस वोटिंग’चे सावट!
  • सुजित महामुलकर

राज्य मंत्रिमंडळातील रिक्त असलेल्या १४ जागांमध्ये आपला नंबर लागेल, या आशेवर अनेक आमदारांची ही टर्मदेखील (आमदारकीची पाच वर्षाची मुदत) संपत आली, मात्र मंत्रिपदाची माळ काही गळ्यात पडली नाही आणि आता पडण्याची शक्यताही मावळली आहे कारण अजूनही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारावर विधान परिषद निवडणूक ‘क्रॉस वोटिंग’चे सावट. (State Cabinet Expansion)

११ जागांसाठी १२ जुलैला मतदान

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या ११ सदस्यांचा कार्यकाळ २७ जुलै २०२४ रोजी संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या जागांकरिता द्विवार्षिक निवडणूक होत असून यासाठी शुक्रवार, १२ जुलै २०२४ रोजी विद्यमान आमदार मतदान करणार आहेत. (State Cabinet Expansion)

मंत्रिमंडळात १४ जागा रिक्त

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपा-शिवसेना (शिंदे)-राष्ट्रवादी (अजित पवार) या तीन पक्षांमधील केवळ १२-१४ आमदारांना मंत्रिपद देणे शक्य आहे. अनेक आमदार गेले साडेचार वर्षे मंत्रीपदासाठी देव पाण्यात ठेऊन बसले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही मंत्रिमंडळ विस्ताराच्या विचारात होते पण लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसल्याने आता ‘ताकही फुंकून पिण्याची वेळ’ आली आहे. (State Cabinet Expansion)

म्हणून विस्तारावरच पाणी..

मंत्रिमंडळ विस्ताराने मंत्रिपद मिळालेले फारतर १४ आमदार संतूष्ट होतील. पण ‘असंतुष्ट’ आमदारांची संख्या त्या तुलनेत खूपच जास्त असण्याची दाट शक्यता असून १२ जुलैला त्याचे विपरीत परिणाम विधान परिषदेच्या ११ जागांच्या मतदानावर होऊ नयेत, यासाठी मंत्रिमंडळ विस्तारावरच पाणी सोडावे लागणार असण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नाराज आमदारांनी ‘क्रॉस वोटिंग’ केले तर भाजपासाठी विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना हा फार मोठा हादरा असेल. (State Cabinet Expansion)

(हेही वाचा – Cement Concrete Road : गुंदवली मेट्रो स्‍थानकाच्‍या खड्डेमय काँक्रिट रस्त्यावर जिओ पॉलिमर तंत्रज्ञानाचा उतारा)

हे ११ आमदार परिषदेतून निवृत्त

विधान परिषद सदस्य डॉ. मनीषा कायंदे, विजय गिरकर, अब्दुल्ला खान अ. लतीफ खान दुर्राणी, नीलय नाईक, ॲड. अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ. वजाहत मिर्झा, डॉ. प्रज्ञा सातव, महादेव जानकर आणि जयंत पाटील हे २७ जुलै २०२४ रोजी विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत. या ११ जागांसाठी १२ जुलैला मतदान होत आहे. (State Cabinet Expansion)

त्याच दिवशी मतमोजणी

या निवडणुकीसाठी मंगळवार, २५ जून २०२४ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून २ जुलै, २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. अर्जांची छाननी ३ जुलै रोजी केली जाईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ५ जुलै, २०२४ अशी आहे. १२ जुलै, २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत विधान भवन येथे या निवडणुकीसाठी विधानसभेतील आमदार मतदान करतील. तर त्याच दिवशी ५ वाजेनंतर मतमोजणी करण्यात येईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. (State Cabinet Expansion)

राजकीय पक्षांपुढे आव्हान

गुरुवारी २७ जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून १२ जुलैला या अधिवेशनाची सांगता होणार आहे. त्यामुळे आमदारांना मतदानासाठी ‘नजरकैदेत’ मुंबईतच ठेवणे हेदेखील सगळ्या राजकीय पक्षांपुढे आव्हान असणार आहे. (State Cabinet Expansion)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.