राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

79

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नागपूर विमानतळावर बोलताना दिली. प्रथम नगरागमनानिमित्त आगमन झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

शिवसेनेच्या वेबसाईटवर एकनाथ शिंदे शिवसेना नेतेच! उपनेते पदी शिंदे गटातील आमदार कायम

लवकरच मंत्रिमंडळ स्थापन करणार

राज्यात सत्तांतरामुळे तसेच 18 जुलै रोजीचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रपती निवडणूकीमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. अधिवेशनाची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी मंत्रीमंडळ स्थापन करण्याचे प्रयत्न राहिल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्यात सध्या अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ लवकर स्थापन होऊन मदतीचे ठोस निर्णय होण्याची गरज आहे. सत्तेच्या खेळात सामान्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी खंत राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विशेष अधिवेशनात बोलताना व्यक्त केली होती. याकडे लक्ष वेधले असता फडणवीस यांनी लवकरच मंत्रिमंडळ स्थापन करू असे सांगितले.

निकाल आमच्या बाजूने लागेल, फडणवीसांना विश्वास 

महाविकास आघाडीकडून 16 आमदारांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव उपाध्यक्ष विधानसभा यांना देण्यात आला होता. त्या विरोधात शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. निकाल आमच्या बाजूने लागेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. विदर्भाचा आम्ही यापूर्वीही विकास केला आहे. आताही करू, असे फडणवीस यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.