मराठा आरक्षणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या (State Commission) सदस्यांनी अलीकडेच राजीनामे दिले आहेत. आयोगाचे सदस्य ॲड. बी. एस. किल्लारीकर आणि प्रा. लक्ष्मण हाके यांच्या पाठोपाठ आनंद निरगुडे यांनी ४ डिसेंबरला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला. शिंदे यांनी त्यांचा राजीनामा मंजूर करून तो पुढील कार्यवाहीसाठी मुख्य सचिवांकडे पाठवला होता. राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला असताना निरगुडे यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने त्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले होते.
(हेही वाचा-National Medical Council च्या लोगोमध्ये भगवान धन्वंतरीचा फोटो)
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज तातडीने आयोगाचे अध्यक्ष आणि इतर तीन सदस्यांची नेमणूक केली. आयोगाचे सदस्य म्हणून डॉ. ओमप्रकाश जाधव, डॉ.मारुती शिकारे आणि प्रा. मच्छिंद्र तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.