भंडारा जिल्ह्यात सोमवारी काही मिनिटांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीचा तपशील कळू शकलेला नाही. परंतु या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भंडा-याचे पालकमंत्री असलेले फडणवीस हे सोमवारी भंडारा जिल्ह्याच्या दौ-यावर होते. त्यांनी जिल्ह्याच्या नियोजन समितीची बैठक घेतली. यानंतर पटोले आणि फडणवीस यांनी एकांतात चर्चा केली. यावेळी जिल्ह्यातील आमदार, अन्य नेते मंडळी आणि प्रमुख अधिकारी खोलीच्या बाहेर होते.
( हेही वाचा: औरंगाबादमध्ये जुगार अड्यावर पोलिसांची धाड; पाच लक्झरी कारसह पावणेदोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त )
फडणवीस- पटोले यांच्या भेटीने चर्चांना उधाण
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेच्या बैठकीमध्ये फडणवीस आणि पटोले यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. नाना पटोले यांनी जेव्हा भाजप सोडले होते तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतरही त्यांनी सातत्याने फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मात्र जेव्हा पालकमंत्री म्हणून फडणवीस हे पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यात आले तेव्हा पटोले यांनी भेट घेत काय चर्चा केली यासंदर्भात आता चर्चा रंगू लागल्या आहेत.
Join Our WhatsApp Community