येत्या एक-दोन दिवसांत भोंग्याच्या वापरावरील गाईडलाईन्स येणार

145

गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोर भोंगे वाजवण्यासंदर्भात वक्तव्य केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. यावर आता सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वाजवण्यासंदर्भात राज्य सरकार नव्या गाईडलाईन्स आणण्याच्या तयारीत असल्याचे संकेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. तसेच या गाईडलाईन्स कधी जाहीर होतील याचीही माहिती त्यांनी दिली.

(हेही वाचा – जरा जपून! सोशल मीडियावर पोस्ट टाकताय? मुंबई पोलिसांचा राहणार वॉच)

गृहमंत्र्यांची दिले आदेश

भोंग्यांसदर्भात एकत्रितपणे धोरण ठरवण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत. यावेळी गृहमंत्री असे म्हणाले की, पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांनी धोरण ठरवावे. तसेत त्यांनी असेही सांगितले की, ‘पुढील एक ते दोन दिवसांत भोंग्यांसंदर्भात धोरण ठरवण्यात येईल. मुंबईसह संपूर्ण राज्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल. यामध्ये सूचना जारी करण्यात येईल.’ गृहमंत्र्यांनी यावेळी जनतेला आवाहन केले आहे की, ‘कुणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. जातीय तेढ निर्माण करणारी व्यक्ती, संघटना किंवा इतर कोणीही, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.’

गृहमंत्र्यांचा गंभीर इशारा

आम्ही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष ठेऊन आहोत. राज्याची शांतता भंग करणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा गंभीर इशाराही यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, भोंग्याच्या मुद्यावरून राज्यात मनसे आक्रमक झाली आहे.

तणाव टाळण्यासाठी गृहविभागाच्या हालचाली सुरू

मनसेने 3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यानंतर आता संभाव्य तणाव टाळण्यासाठी गृहविभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यातील प्रार्थनास्थळांना भोंगे लावण्यासाठी परवानगी घेणे अनिवार्य असणार आहे. त्याशिवाय, राज्यभर भोंग्यांसंदर्भात सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटोकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले जाणार असल्याची माहिती गृहखात्यातील सूत्रांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.