State Election Commission : राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी; ७ हजार ३६० तक्रारी निकाली

30

विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. परंतू, गेल्या काही दिवसात आचारसंहितेचा भंग (Violation code of conduct) होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. सी-व्हिजील ॲपवर (C-Vigil App) महिन्याभरामध्ये ७ हजार ४०० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ७ हजार ३६० तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. अशी माहिती मुख्य निवडणूक आधिकारी कार्यालयाने दिली आहे. (State Election Commission)

विधानसभा निवडणूका (Maharashtra Assembly Election 2024) जाहीर होताच १५ ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी जिल्हा निवडणूक विभाग (District Election Department) सज्ज झाला आहे. दरम्यान सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल करत आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

(हेही वाचा – Lawrence Bishnoi च्या निशाण्यावर आफताब पूनावाला; मुंबई पोलिसांच्या खुलाशामुळे तिहार तुरुंगात उडाली खळबळ

५४६ कोटी रुपयांपेक्षा मालमत्ता जप्त

दरम्यान, १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५४६ कोटी ८४ लाख (Rs 546 crore 84 lakh seized) रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

हेही पाहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.