Assembly Winter Session : ‘हाफकीन’ने ७१ टक्के औषधांचा पुरवठा नाही केला! ‘कॅग’च्या अहवालात ठपका!

129
Assembly Winter Session : 'हाफकीन'ने ७१ टक्के औषधांचा पुरवठा नाही केला! 'कॅग'च्या अहवालात ठपका!
  • खास प्रतिनिधी

देशातील नामांकित संस्था म्हणून गणल्या जाणाऱ्या लसनिर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध ‘हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळा’वर भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) यांनी ताशेरे ओढले आहेत. या महामंडळाने २०१६-१७ ते २०२१-२२ या सहा वर्षांत मागणी केलेल्या रुग्णालयांना ७१ टक्के औषधांचा पुरवठा केलाच नसल्याची माहिती ‘कॅग’च्या अहवालातून उघड झाली आहे. (Assembly Winter Session)

भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) यांचा ‘महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवांचे व्यवस्थापन’ यासंदर्भातील लेखापरीक्षा अहवाल (२०१६-१७ ते २०२१-२२) शनिवारी २१ डिसेंबर २०२४ या दिवशी विधानसभेत सादर करण्यात आला. या अहवालात राज्यातील आरोग्य व्यवस्थेसंदर्भात गंभीर निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. (Assembly Winter Session)

(हेही वाचा – Sanjay Raut Home Reiki : संजय राऊतांचा नुसताच कांगावा; निवासस्थानी रेकी करण्यासाठी नव्हे तर जिओ नेटवर्क टेस्ट ड्राईव्हसाठी आलेले)

औषध पुरवठा नाही

हाफकिन या संस्थेकडे औषध पुरवठा करण्यासाठी देण्यात आलेले २०५२ कोटी रुपये खर्च न करता पडून आहेत, असे या कॅग अहवालात नमूद करण्यात आले आहे. आरोग्य सेवा आयुक्त, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागांतर्गत येणाऱ्या संस्थांसाठी औषध खरेदीची जबाबदारी हाफकीनकडे देण्यात आली आहे. मात्र, २०१६-१७ ते २०२१-२२ या आर्थिक वर्षात तिन्ही संस्थांनी मागणी केलेल्या औषधांचा तपशील आरोग्य सेवा आयुक्तांकडे नव्हता. वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाशी संबंधित १२ संस्थांनी मागणी केलेल्या संस्थांचा तपशील उपलब्ध झाला. मात्र, या संस्थांनी मागणी केलेल्या ७१ टक्के वस्तूंचा पुरवठा हाफकीनने केलाच नसल्याचे अहवालाता स्पष्ट करण्यात आले आहे. (Assembly Winter Session)

(हेही वाचा – Assembly Winter Session : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले; अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्च २०२५ पासून)

अखर्चित रक्कम कोटींमध्ये

गेल्या पाच वर्षांत सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि औषधी द्रव्य विभागाकडून हाफकीनकडे ४,२९८ कोटी रुपयांच्या औषध पुरवठ्याची मागणी आली. त्यावर हाफकीनने केवळ २,९७९ कोटी रुपये किमतीचा औषध पुरवठा करण्याचे आदेश काढले. त्यातही २०८६ कोटींची औषधे प्रत्यक्षात पुरवण्यात आली. याचा अर्थ औषध पुरवठा करण्यात अपयशी ठरल्यामुळे हाफकीनकडे तब्बल ४८ टक्के रक्कम म्हणजेच २०५२ कोटी रुपये अखर्चित राहिली. त्यामुळे रुग्णसेवेवर प्रचंड ताण आला. यामध्ये २०१९-२० मध्ये ३३२ कोटी, २०२०-२१ मध्ये ८४२ कोटी, तर २०२१-२२ मध्ये ३४७ कोटी रुपये अखर्चित राहिले. (Assembly Winter Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.