
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आंबा, काजू, सुपारी, नारळ, कोकम आणि मासळी उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेल्या या भागात नवीन कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपली उत्पादने विकण्यासाठी १५०-२०० किमी अंतरावरील रत्नागिरी बाजार समितीपर्यंत जाण्याची गरज भासणार नाही. (New Market Committees)
यापूर्वी स्थानिक बाजारपेठेच्या अभावामुळे शेतकऱ्यांना वाहतूक खर्च, वेळ आणि श्रमांचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येचे निराकरण करण्यासाठी राज्यमंत्री योगेश कदम यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत दापोली, खेड आणि मंडणगड येथे स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याचा शासन निर्णय जारी झाला आहे. (New Market Committees)
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर उत्पादने विकण्याची संधी मिळेल, वाहतूक खर्च आणि वेळेची बचत होईल. स्थानिक आर्थिक व्यवहारांना चालना मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठीच्या प्रभावी भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा निर्णय रत्नागिरी जिल्ह्यातील शेती आणि मत्स्य उत्पादकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. (New Market Committees)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community