गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यात जवळीक वाढवताना दिसत आहे. त्यांच्या गाठी भेटी देखील वाढल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सवदरम्यान एकनाथ शिंदे हे मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गेले होते. तसेच राज्य सरकारने महाविकास आघाडीच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली असली तरी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अशातच शिंदे गटाकडून नार्वेकर यांचं कौतुक करण्यात आले आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीदेखील शनिवारी मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे.
(हेही वाचा – एलॉन मस्कला Twitter डील पडली महागात, मालक होण्याच्या नादात बुडाले इतके कोटी डॉलर)
मिलिंद नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि खूप जवळचे निकटवर्तीय आहेत. ते उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम पाहतात. नार्वेकर हे ठाकरे कुटुंबाचे एक सदस्यच आहेत, असे त्यांचे संबंध आहेत. दरम्यान, उदय सामंत यांनी नार्वेकर यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले उदय सामंत
मी शिवसेनेत येण्याआधी मिलिंद नार्वेकर यांनी माझी उद्धव ठाकरे यांची भेट घालून दिली होती. ते सर्वाना मदत करता. आम्ही सदैव मिलिंद नार्वेकरांसोबत आहोत, मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येत असतील तर त्यांचे स्वागत करू असे वक्तव्य उदय सामंत यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून सामंत यांनी केलेल्या या विधानाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पुढे ते असेही म्हणाले की, आम्ही जरी आज तरी मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत नसलो तरी त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. प्रत्येक माणसाला मदत करणारी ती व्यक्ती आहे. मला देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत आणण्यात आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घडवून देण्यात मिलिंद नार्वेकर अग्रेसर होते. त्यामुळे आम्ही जरी शिंदेंसोबत असलो तरी मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल आमच्याकडून वाईट चितलं जाणार नाही. मिलिंद नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांनादेखील राजकीय ताकद दिली होती”
Join Our WhatsApp Community