State Legislative Council Elections : विधानसभेतील सात आमदार मतदार का झाले कमी?

166
Legislative Council Elections : महाविकास आघाडी शेकापचा गेम करणार...
  • सुजित महामुलकर

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सात आमदार लोकसभेत गेल्याने जुलैमध्ये विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत सात मतदार कमी होणार असून त्यात काँग्रेसच्या चार सदस्यांचा समावेश आहे. सद्यातरी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील मतांमध्ये मोठा फरक असल्याने निवडणुकीवर त्याचा फार परिणाम होईल, याची शक्यता खूप कमी आहे. (State Legislative Council Elections)

१४ दिवसात राजीनामा बंधनकारक

राज्यात लोकसभा निवडणूक रिंगणात विद्यमान १६ आमदार उतरले होते तर त्यात सात आमदारांनी बाजी मारत लोकसभेत प्रवेश मिळवला. या सातमध्ये काँग्रेसचे चार, शिवसेना (शिंदे) दोन तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एकाचा समावेश आहे. नियमानुसार खासदार म्हणून निवडून आल्यानंतर १४ दिवसांत त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देणे बंधनकारक आहे. त्यामुळे या सातही आमदारांनी पदाचा राजीनामा दिल्याने ते १२ जुलैला होणाऱ्या निवडणुकीत मतदान करू शकणार नाहीत, अशी माहिती राज्य विधिमंडळाचे निवृत्त प्रधान सचिन अनंत कळसे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’सही बोलताना दिली. (State Legislative Council Elections)

काँग्रेसच्या चारपैकी तीन महिला

लोकसभेत झेंडा फडकावणाऱ्या काँग्रेसच्या चारपैकी तीन महिला आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि धारवीच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत भाजपाच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. तर सोलापूर मतदार संघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपाचे आमदार राम सातपुते यांचा पराभव केला. काँग्रेसच्या वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी तर राज्यातील ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर विजय मिळवला. काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी तर बहुचर्चित अपक्ष खासदार आणि भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांना घरचा रस्ता दाखवला. (State Legislative Council Elections)

(हेही वाचा – राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार; Chandrashekhar Bawankule यांनी व्यक्त केला विश्वास)

वायकर विजयी, उबाठा उदास

राज्य मंत्रिमंडळातील (शिवसने-शिंदे) मंत्री संदीपान भुमरे यांनी छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदार संघात झालेल्या तिरंगी लढतीत बाजी मारत एमआयएमचे इम्तियाज जलील आणि शिवसेना उबाठाचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला तर रवींद्र वायकर यांनी शिवसेना उबाठाचे अमोल कीर्तिकर यांचा केवळ ४८ मतांनी केलेला पराभव उबाठाच्या जिव्हारी लागला. उबाठाने वायकर यांना खसदारकीची शपथ घेण्यापासून रोखण्यासाठी पत्रव्यवहार करीत खूप प्रयत्न केला मात्र अखेर वायकर यांनी मंगळवारी लोकसभेत शपथ घेतली. (State Legislative Council Elections)

९ आमदार विधानसभेच्या तयारीत

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांना पराभूत केले. तर अन्य ९ आमदारांनी पुन्हा आपल्या विधानसभेचा रस्ता धरत, तीन-चार महिन्यांवर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नशीब आजमावण्याची तयारी सुरू केली आहे. (State Legislative Council Elections)

आमदार मतदार

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या ११ सदस्यांचा कार्यकाळ २७ जुलै २०२४ रोजी संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या जागांकरिता द्विवार्षिक निवडणूक होत असून यासाठी शुक्रवार, १२ जुलै २०२४ रोजी विद्यमान आमदार मतदान करणार आहेत. (State Legislative Council Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.