काँग्रेसपाठोपाठ आता भाजपचं मिशन गोवा

142

काँग्रेसपाठोपाठ आता भाजपचं मिशन गोवा असून भाजपने गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस गुरुवारी मध्यरात्री गोव्यात दाखल झाले असून त्यांनी या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसायला सुरूवात केली आहे.

हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात 

काँग्रेसचे महासचिव आणि केंद्रीय निवडणूक समितीचे प्रभारी मुकुल वासनिक यांनी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवारांची घोषणा केली आहे. तलिगावमधून टोनी रोड्रिग्स, पोंडा येथून राजेश वेरेनकर, मर्मुगावमधून संकल्प अमोनकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. कर्टोरिम येथून एलिक्सो रेजिनाल्डो लारेन्सो हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

( हेही वाचा – नांदगावरकर ‘मनसे’ सोडणार! चर्चेला पूर्ण विराम; म्हणाले…)

भाजपच्या अंतर्गत जोरदार राजकीय खलबते

काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनी 2012 ते 2017 दरम्यान मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. सध्या ते गोवा विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते आहेत. मरगावमधून दिगंबर कामत आणि कुनकोलिममधून यूरी अलीवामो हे काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेसच्या पहिल्या यादीत मापुसा विधानसभा क्षेत्राचे सुधीर कानोलकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसच्या पहिली उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर भाजपच्या अंतर्गत गोटातही जोरदार राजकीय खलबते सुरू झाली आहे. रात्री अचानक उशिरा राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस गोव्यात दाखल झाले आहेत.

देशात काँग्रेस पक्ष आता पार्ट टाईम

आगामी दोन दिवसांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीसांनी गोव्यातून काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस पक्षाची स्थिती देशात कशी आहे ते तुम्ही पाहत आहात. देशात काँग्रेस हळूहळू नामशेष होत आहे. देशात काँग्रेस पक्ष आता पार्ट टाईम पक्ष झाला आहे. कारण काँग्रेसचे नेते पार्ट टाईम आहेत ते फुल टाईम काम करत नाहीत. त्यामुळे त्यांचा पक्षही पार्ट टाईम आहे तो फूल टाईम राजकारण करत नाहीत. तो पूर्णवेळ जनतेची सेवाही करत नाही. चालवायचा म्हणून पक्ष चालला आहे. जुन्या पुण्याईवर पक्ष चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ती सुद्धा संपली असून जुने नेते राहिले नाहीत अशी काँग्रेसची अवस्था पाहायला मिळत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.