
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर शनिवारपासून विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात पहिल्या दिवशी आमदारांचा शपथविधी पार पडला. पण, महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आमदारांनी ईव्हीएमचा मुद्दा (Issue of EVMs) आणि निकालाबद्दल शंका उपस्थित करत शपथविधीवर बहिष्कार (Boycott of Oaths) टाकला. या भूमिकेवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर हल्ला चढवला. शनिवारी (७ डिसेंबर) विशेष अधिवेशनात १७३ नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. मात्र, महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर आमदारांच्या शपथविधी आणि विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी विशेष अधिवेशन होत आहे.
हा संविधानाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान -बावनकुळे
महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकल्याच्या मुद्द्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. “मविआकडून संविधानाचा अवमान ! राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे संविधान फक्त निवडणुकीपुरते आठवते, हे त्यांनी आपल्या कालच्या कृतीतून सिद्ध केले”, असे विधान चंद्रशेखर बावणकुळे यांनी केले. “विधानसभेतील नवनिर्वाचित सदस्यांना संविधानाच्या साक्षीने आमदारकीची शपथ घेणे संविधानिकदृष्ट्या आवश्यक असूनही मविआ सदस्यांनी शपथ घ्यायला नकार दिला. हा संविधानाचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे. याचा निषेध करावा तेवढे कमीच आहे”, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
(हेही वाचा – दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाचा धुरा सांभाळण्यासाठी Devendra Fadnavis सज्ज)
शपथविधीसाठी आले आणि नंतर काय घडले?
महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे आमदार शपथविधीसाठी विधिमंडळात आले. सकाळी ११ वाजता आमदार विधानसभेत हजर होते. दरम्यान, शपथ न घेता बाहेर पडण्याचा निरोप आमदारांना कळवण्यात आला. मारकडवाडीतील ग्रामस्थांना मतदान घेऊ न देण्याचा प्रशासनाचा निर्णय, वाढीव मतदान आणि ईव्हीएमचा मुद्द्या यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ घेऊ नये असा निरोप आमदारांपर्यंत पोहोचवण्यात आला होता. त्यानंतर आमदारांनी सभात्याग केला.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community