दिवंगत रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी या रिक्त झालेल्या जागेवर उभे राहावे, असा आग्रह पक्षाने धरला होता. त्यामुळे ऋतुजा लटके यांनी महापालिकेतील लिपीक पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांचा राजीनामा पालिकेकडून स्वीकारण्यात आला नव्हता. दरम्यान, आज शुक्रवारी ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूकीकडे साऱ्याचे लक्ष लागून आहे. अशातच निवडणुकीतील विजयावर दोन्ही बाजूने दावा केला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या निवडणुकीतील विजयावर भाष्य केले आहे.
(हेही वाचा – Video: पंतप्रधान मोदींच्या आईबाबत ‘आप’च्या नेत्याने केलं आक्षेपार्ह विधान; भाजप आक्रमक)
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे ते आपला निवडणूक अर्ज आज, शुक्रवारी भरणार आहे. यावेळी बावनकुळे म्हणाले, माझ्यासह अन्य भाजप नेते त्यांच्यासह हा अर्ज भरण्यास जात आहोत. आम्हीच जिंकू असा आम्हाला ठाम विश्वास आहे. याशिवाय 51 टक्के मत घेऊ आणि अंधेरी पूर्व विधानसभेची निवडणूक आम्हीच जिंकू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिंदे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यावरूनच बरंच राजकारण झालं, यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, लटकेंच्या राजीनाम्याशी आमचा काही संबंध नाही. यासह ते असेही म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी मशाल घेतली. अडीच वर्ष राष्ट्रवादी-काँग्रेसबरोबर युती केली. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससह त्यांनी हात मिळवणी कली. मशाल काँग्रेसच्या हाती आहे. त्याच हातात घड्याळ आहे. त्यामुळे मतदार मतदान करणार नाही. बाळासाहेबांची शिवसेना शिंदे साहेब नेतृत्वात काम करत आहे. ही सेना उद्धव ठाकरेंची मशाल विझवल्याशिवाय राहणार नाहीत.
Join Our WhatsApp Community