मागच्या काही दिवसांपासून एसटी कर्मचा-यांचा संप चालू आहे. या संपावर राज्य सरकारकडून अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही. एसटी कर्मचारी मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घ्यायला तयार नाहीत. आता याच पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी या दोन नेत्यांमध्ये बैठक झाली.
सुधारित प्रस्ताव तयार केला जाणार
परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सिल्वर ओक येथे 10 मिनटे चर्चा झाली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली. या प्रकरणात समन्वयाने सुवर्णमध्य काढत संप कसा मिटवता येईल, या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्र्यांना काही पर्याय सूचवले आहेत. या पर्यायांचा एक सुधारित प्रस्ताव परिवहन मंत्रालय तयार करत आहे.
(हेही वाचा राज्यातील हिंसाचाराला रझा अकादमी कारणीभूत! नितेश राणेंचा आरोप )
हा प्रस्ताव लवकरच तयार करून संपकरी कर्मचारी संघटनांना दिला जाणार आणि त्यावर समाधानकारक तोडगा काढला जाणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेत संप मिटवण्यासाठी निर्णायक चर्चा झाली.
Join Our WhatsApp Community