राज्यपाल निभावतात मदमस्त हत्तींचा ‘रोल’! सामनातून घणाघात

त्याच हत्तींच्या पायाखाली लोकशाही तुडवली जात असल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे.

ठाकरे सरकार आणि राज्यपाल यांच्यात आजवर अनेक संघर्ष झाल्याचे पहायला मिळाले आहे. राज्यातील महिला अत्याचारांवरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रावरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता सामनातील अग्रलेखात पुन्हा एकदा राज्यपालांच्या भूमिकेवर जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजपाचे ज्या राज्यांत नाहीत त्या राज्यांतील राज्यपाल हे मदमस्त उधळलेल्या हत्तीचाच रोल अदा करत असून, अशा हत्तींचे माहुत दिल्लीत बसून नियंत्रण करत असतात. त्याच हत्तींच्या पायाखाली लोकशाही तुडवली जात असल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे.

(हेही वाचाः राज्यपालांनी महिला सुरक्षेसाठी लिहिलेल्या पत्राला सरकारकडून केराची टोपली?)

या राज्यांतील राजभवनाच्या संवेदना मेल्या?

देशातील इतरही राज्यांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण ज्या राज्यांत भाजपाची सत्ता आहे त्या राज्यांमधील राज्यापाल शांत आहेत. उत्तरप्रदेशांत महंतांचा संशयास्पद मृत्यू होतो, मध्य प्रदेशात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. हे काही चांगल्या कायदा-सुव्यवस्थेचे लक्षण नाही. पण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जशी राज्यातील महिला अत्याचार, कायदा-सुव्यवस्था यांच्याबाबत चिंता वाटते तशी उत्तर प्रदेश आणि राज्यपालांना का वाटू नये?, का तेथील राजभवनाच्या संवेदना मरुन पडल्या आहेत, असा खोचक सवाल सामनातील अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

(हेही वाचाः राज्यपालांची राज्याकडे मागणी, मुख्यमंत्र्यांनी चक्क ‘ती’ फेटाळली!)

दिल्लीतील माहुतांचे राज्यातील हत्तींवर नियंत्रण

राज्यपाल हे सरकारी पैशांवर पोसले जाणारे पांढरे हत्ती नाहीत. दिल्लीत सत्ता असलेल्या पक्षांची सरकारे ज्या राज्यांत नाहीत त्या राज्यांतील राज्यपाल हे मदमस्त हत्तींचाच रोल अदा करत आहेत. अशा हत्तींवर दिल्लीत बसून काही माहुत नियंत्रण ठेवत आहेत. त्याच हत्तीच्या पायाखाली लोकशाही घटना, कायदा, राजकीय संस्कृती तुडवत वेगळे पायंडे पाडले जात असल्याचा झणझणीत आरोप सामनातून करण्यात आला आहे.

(हेही वाचाः ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश राजभवनात का अडकणार? जाणून घ्या)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here