Stock Market Biggest Falls : हर्षद मेहता घोटाळा ते कोव्हिड…शेअर बाजारातील सगळ्यात मोठ्या पडझडीचे ५ दिवस

Stock Market Biggest Falls : हर्षद मेहता घोटाळा ते कोव्हिड…शेअर बाजारातील सगळ्यात मोठ्या पडझडीचे ५ दिवस

96
Stock Market Biggest Falls : हर्षद मेहता घोटाळा ते कोव्हिड…शेअर बाजारातील सगळ्यात मोठ्या पडझडीचे ५ दिवस
Stock Market Biggest Falls : हर्षद मेहता घोटाळा ते कोव्हिड…शेअर बाजारातील सगळ्यात मोठ्या पडझडीचे ५ दिवस

 

ऋजुता लुकतुके

७ एप्रिल २०२५ हा दिवस भारतीय शेअर बाजारात अभूतपूर्व पडझड (Stock Market Biggest Falls) घेऊन आला आहे. सुरुवातीच्या काही मिनिटांतच निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक तब्बल ५ टक्क्यांनी खाली आले. सेन्सेक्समध्ये जवळ जवळ ४,००० अंशांची घसरण झाली. तर निफ्टी निर्देशांकही २१,७५० हून खाली गेला. त्यात ९०० अंशांची घसरण झाली. कोव्हिडनंतर एका दिवसांत इतकी मोठी पडझड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. २०२४ मध्ये जून महिन्यात २४ तारखेला युद्धाच्या भीतीमुळे एकदा असा बाजार कोसळला होता. पण, ५ टक्क्यांची घसरण होण्याचा अनुभव विरळाच आहे. काही मिनिटांतच गुंतवणूकदारांच्या १६ लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे. (Stock Market Biggest Falls)

हेही वाचा-Supreme Court च्या आवारात २६ झाडांच्या पुनर्रोपणाला दिल्ली उच्च न्यायालयाची मान्यता !

थोडं इतिहासात डोकावून अशी वेळ यापूर्वी शेअर बाजारांवर कधी आली होती याचा आढावा घेऊया, (Stock Market Biggest Falls)

हेही वाचा- IPL 2025, MI vs RCB : विराट, फील सॉल्टना आव्हान बुमराहच्या पहिल्या चेंडूंवर चौकार किंवा षटकार ठोकण्याचं

हर्षद मेहता घोटाळा (१९९२) : २८ एप्रिल १९९२ रोजी हर्षद मेहताने शेअर बाजारात केलेला घोटाळा उघडकीस आला होता. शेअरच्या किमती कृत्रिम पद्धतीने फुगवून बाजारात फुगवटा निर्माण झाल्याचं यंत्रणांच्या लक्षात आलं. आणि शेअर बाजारात हडकंप उडाला. एका दिवसांत सेन्सेक्स ५७० अंशांनी कोसळला. त्या काळात टक्केवारीच्या हिशोबात ही पडझड १२.५७ टक्क्यांची होती. हर्षद मेहताचा घोटाळा ४,००० कोटी रुपयांचा होता. या घोटाळ्यानंतर देशातील वित्तीय बाजार व्यवस्थाच बदलली. आणि गुंतवणूकदारांच्या हितसंरक्षणासाठी सेबीचे अधिकार वाढवण्यात आले. (Stock Market Biggest Falls)

हेही वाचा- बँक खात्यांमध्ये एकूण जमा रकमेपैकी ३९.७% रकमेत महिलांचाच वाटा ; केंद्र सरकारने भारतातील ‘Women and Men in India 2024’ अहवाल केला जारी

केतन पारिख घोटाळा (२००१) : शेअर बाजारात पुन्हा एकदा नवीन घोटाळा समोर आला. केतन पारिख या एका दलालाने गुंतवणुदारांचे पैसे बुडवले होते. शेअर बाजार नुकता ऑनलाईन व्यवहार सुरू करत होता. आणि त्यातच हा धक्का बाजाराला बसला. जगभरात डॉटकॉम कंपन्यांची चलती होती. आणि त्याचाच फायदा घेऊन पारिखने संधी साधली होती. २ मार्च २००१ ला घोटाळा उघडकीस आल्यावर शेअर बाजारात ४.१३ टक्क्यांची घसरण एकाच दिवशी झाली. ही घसरण १७६ अंशांची होती. त्याचवेळी गुजरातमध्ये भूकंप झाला होता. आणि जागतिक वातावरणही अस्थिर होतं. (Stock Market Biggest Falls)

हेही वाचा- Primary Education महागले; शाळांच्या शुल्कात तीन वर्षांत ५०-८० टक्क्यांची वाढ

सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल (२००४) : २००४ च्या लोकसभा निवडणुकीत लोकशाही आघाडीचा अनपेक्षित पराभव झाला. आणि केंद्रात युपीएचं सरकार सत्तेत आलं. आधीच्या सरकारने सुरू केलल्या आर्थिक सुधारणांचं पुढे काय होणार या भीतीने शेअर बाजारात घबराट पसरली. १७ मे २००४ रोजी शेअर बाजार ११.१ टक्क्यांनी कोसळला. दोनदा बाजाराचं कामकाजही थांबवावं लागलं. नवीन युपीए सरकारने आपली व्यापारी धोरणं जाहीर केली आणि जुन्या सुधारणा पुढे घेऊन जाण्याचं आश्वासन दिलं तेव्हा शेअर बाजार सावरला. (Stock Market Biggest Falls)

हेही वाचा- Indian Navy ने वाचवला पाकिस्तानी मच्छिमाराचा जीव ; समुद्रात केली शस्त्रक्रिया

जागतिक आर्थिक मंदी (२००८) : २००८ मध्ये लेहमन ब्रदर्स या जागतिक दर्जाच्या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. आणि जगभरात वित्तीय क्षेत्राला तो एक मोठा धक्का होता. २००८ वर्षाची सुरुवातच या धक्क्याने झाली. आणि २१ जानेवारी २००८ ला सेन्सेक्समध्ये १,४०८ अंशांची किंवा ७.४ टक्क्यांची पडझड झाली. जगभरात मंदीचं वातावरण पसरलं होतं. आणि वित्तीयच नाही तर इतर क्षेत्रातही नोकऱ्या जात होत्या. शेअर बाजारावर काही वर्षं याचे परिणाम दिसत राहिले. (Stock Market Biggest Falls)

हेही वाचा- World Health Day : तातडीच्या उपचारांसाठी अ‍ॅलोपॅथी; समूळ रोगनिर्मूलनासाठी आयुर्वेदच

कोव्हिड (२०२०) : कोव्हिडच्या लाटेमुळे जगभरात हलकल्लोळ माजलेला असताना भारतातही लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करणं गरजेचं बनलं. आणि २३ मार्च २०२० ला लॉकडाऊन जाहीर झालेल्या दिवशी शेअर बाजारांत १३ टक्क्यांची पडझड झाली. निर्देशांक ३,९३५ अंशांनी खाली आला. कोव्हिडच्या भीतीतून बाहेर यायला इतर क्षेत्रांप्रमाणेच शेअर बाजारालाही २ वर्षं लागली. (Stock Market Biggest Falls)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.