“तुमची दहशत गुंड, बलात्काऱ्यांवर दाखवा…”, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

163

कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघीड सरकारने मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. दरम्यान काल भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरात आलेल्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. चित्रा वाघ यांच्या या दाव्यामुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली आहे.

कोल्हापुरात जाहीर सभेत दगडफेक

मिळालेल्या माहितीनुसार, सभा सुरु असताना काही अज्ञातांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. कोल्हापूर शहरातील मुक्त सैनिक वसाहतीमधील जाहीर सभेत व्यासपीठाच्या दिशेने दगडे फिरकावण्याचा प्रकार घडल्याचे समोर आला आहे. या घटनेसंदर्भात चित्रा वाघ यांनी कोल्हापूरचे एसपी यांचे भेट घेतली. तसेच रितसर लेखी फिर्याद नोंदवणार असल्याचे सांगितले आहे. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना चित्रा वाघ यांनी गृहराज्य मंत्र्यांची दहशत विरोधकांवर नाही तर गुंडावर आणि बलात्काऱ्यांवर असावी अशा शब्दात कोल्हापूरचे पालकमंत्री आणि गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली आहे.

(हेही वाचा – नितीन गडकरींनी राज ठाकरेंच्या भेटीचे सांगितले कारण, म्हणाले …)

काय म्हटले आहे ट्वीटमध्ये…

यासंदर्भात चित्रा वाघ यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्या म्हणतात, वाह रे बहाद्दरांनो, समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगडं मारता. आज संध्याकाळी भाजपा उत्तर कोल्हापूर उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ सभेत मी बोलत असतांना तिथे दगडे मारण्यात आली. तुमची दहशत गुंड बलात्काऱ्यांवर दाखवा असल्या थेरांना घाबरणारी चित्रा वाघ नाही हे लक्षातचं ठेवा, असे चित्रा वाघ यांनी खडासावून सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.