विश्व हिंदू परिषदेच्या श्रीराज नायर तसेच संजय ढवळीकर यांच्या शिस्त मंडळाने सोमवार २६ सप्टेंबर रोजी मुंबई येथील ब्रिटीश उच्चायुक्तांना भेटून ब्रिटन मध्ये हिंदूंच्या मंदिरांवर व निष्पाप हिंदू नागरिकांवर होणारे जिहादी हल्ले त्वरित थांबवावे तसेच हल्ले करणाऱ्या जिहाद्यांना त्वरित अटक करून कठोर शासन करण्याची मागणी केली आहे.
ब्रिटन सरकार हिंदुंवरील हल्ले रोखण्यात अयशस्वी
२१ सप्टेंबर रोजी बर्मिंघम, लंडन, लेस्टर येथील हिंदू मंदिरांना तसेच सांस्कृतिक व धार्मिक प्रतिकांना जिहादी धर्मांध मुसलमानांनी लक्ष्य केले होते. या भ्याड हल्ल्यात अनेक हिंदू नागरिक जबर जखमी झाले होते, तसेच हिंदूंच्या संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले होते. ४ सप्टेंबर पासून ब्रिटनच्या विविध भागात हिंदू मंदिरे, हिंदू संपत्ती तसेच हिंदू नागरिकांना ठरवून लक्ष्य करण्यात येत आहे. परंतु ब्रिटनचे स्थानिक प्रशासन हे जिहादी हल्ले थांबवण्यात अयशस्वी ठरत आहे. यामुळे अनेक हिंदू परिवारांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवणे बंद केले आहे.
कारवाईची मागणी
ठरवून हिंदू समाजावर जिहादी हल्ले करून “हिंदू-मुसलमान दंगे” म्हणत हल्ल्यांचे सर्व खापर हिंदूंच्या माथी मारून मुस्लिम समाज निष्पाप असल्याचे ढोंग करत आहे. मुस्लिम समाजाचा ढोंगीपणा उघडकीस आणून त्यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकरी अध्यक्ष अलोक कुमार यांनी ब्रिटनच्या नव नियुक्त पंतप्रधान लीज ट्रस यांना पत्र पाठवून मागणी केली आहे. तसेच या भ्याड हल्याचा निषेध देखील नोंदवला आहे.
ब्रिटनमध्ये एकूण लोकसंखेच्या १.५% हिंदू समाज राहत असून, शांतीप्रिय व बुद्धीजीवी हिंदू समाज स्थानिक नियमांचे काटेकोर पालन करत स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणत रोजगार उपलब्ध करून देतो. असे वक्तव्य हिंदू समाजाने आयोजित केलेल्या सार्वजनिक कार्यक्रमात दिवंगत प्रधानमंत्री मार्गारेट थैचर यांनी केले होते.
Join Our WhatsApp Community