Mahayuti मध्ये तणाव; भाजपाकडून शिवसेनेला इशारा?

भाजपा-शिवसेनेतील संबंध तणावग्रस्त?

141
Mahayuti मध्ये तणाव; भाजपाकडून शिवसेनेला इशारा?
  • प्रतिनिधी

तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाटत होते की, केंद्रातील सरकार टिकवण्यासाठी भाजपाला महायुतीतील (Mahayuti) घटक पक्षांची गरज आहे. त्यामुळे शिवसेना महायुतीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा त्यांचा विश्वास होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देताना शिवसेनेने घेतलेल्या वेळेमुळे भाजपा नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विशेषतः, तत्कालिन शिंदे सरकारच्या कार्यकाळातील काही महत्त्वाच्या निर्णयांची चौकशी सुरू करून भाजपाने अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला इशारा दिला आहे. त्यामुळे महायुतीतील (Mahayuti) भाजपा-शिवसेना संबंध आणखी तणावग्रस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेच्या मंत्र्यांचे निर्णय रद्द

तत्कालिन शिंदे सरकारच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयांवर भाजपाने आक्षेप घेतला आहे. एसटी महामंडळासाठी १,३१० बस खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्याने हा करार रद्द करण्यात आला. याशिवाय, आरोग्य विभागातील औषध खरेदी व्यवहाराची चौकशी सुरू आहे. (Mahayuti)

शिवसेनेच्या काळात मंजूर जालन्यातील सिडको प्रकल्पातील व्यवहारांत अनियमितता आढळल्याने त्या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, मुंबई महानगरपालिकेच्या झोपडपट्टी स्वच्छता आणि देखभाल योजनेसाठी मंजूर केलेल्या १,४०० कोटींच्या निविदाही रद्द करण्यात आल्या आहेत. ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या निविदांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप झाल्याने, त्या प्रकल्पाची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कामकाजावर भाजपने थेट आक्षेप घेतला आहे.

(हेही वाचा – ‘Vande Bharat’ मध्ये आता मराठी वृत्तपत्रे उपलब्ध होणार)

भाजपाकडून शिवसेनेची आर्थिक नाकाबंदी?

कल्याण-डोंबिवलीतील बनावट रेरा प्रमाणपत्र घोटाळ्याच्या चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तपास सुरू केला आहे. हा तपास शिवसेनेसाठी एकप्रकारे भाजपाचा इशारा मानला जात आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपा्कडून शिवसेनेच्या आर्थिक स्रोतांवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आर्थिक स्रोत बंद पडल्यास शिवसेना अडचणीत येऊ शकते. (Mahayuti)

भाजपा-शिवसेनेत दुरावा वाढणार?

भाजपाच्या या हालचालींमुळे महायुतीत (Mahayuti) सत्तासंघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेवर दबाव वाढत असताना, दुसरीकडे अजित पवार गटाने भाजपाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

त्यामुळे, भाजपा अजित पवार गटाला सध्या काहीसा सवलतीचा धोरण ठेवत आहे. तसेच, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजपा वाटाघाटी करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

महायुतीत मतभेद वाढणार?

भाजपाकडून सुरू असलेल्या हालचालींमुळे महायुतीतील (Mahayuti) सत्तासंतुलन बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेसाठी पुढील काही महिने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे भाजपा-शिवसेना यांच्यातील राजकीय नातेसंबंध भविष्यात कोणत्या वळणावर जातात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.