राजकोट पुतळा संदर्भात दोषींवर कडक कारवाई होणार – Ravindra Chavan

176
 राजकोट पुतळा संदर्भात दोषींवर कडक कारवाई होणार - Ravindra Chavan
 राजकोट पुतळा संदर्भात दोषींवर कडक कारवाई होणार - Ravindra Chavan
मुंबई प्रतिनिधी

नौदल दिनाचे (Navy Day) औचित्य साधत आठ महिन्यांपूर्वी  मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील  राजकोट किल्ल्यावर (Rajkot Forts) उभारण्यात आलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेला  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा (Statue of Shivaji Maharaj collapsed) कोसळल्याची घटना सोमवारी घडल्याने  विरोधी पक्ष तसेच  शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्ष महाविकास आघाडीने या घटनेवरून राज्य सरकारला लक्ष्य करीत पुतळा कोसळल्याच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (Ravindra Chavan)शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले आजही भक्कम आहेत. पण २०२३ मध्ये सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेस्तनाबूत झाला. या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील पैसे खाल्ले यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या भ्रष्ट कारभारावर टीका केली. टक्केवारीत अडकलेल्या सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे हे लाजिरवाणे उदाहरण असून या घटनेची चोकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केला आहे.

(हेही वाचा – आमदार Mihir Kotecha यांच्या नावाने कोण करतंय बेकायदेशीर वसुली)

या ठिकाणी पुन्हा एकदा दिमाखात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा.  महाराजांची अवहेलना करणाऱ्या कंत्राटदाराला काळया यादीत टाकण्यात यावे.  संबंधित कंत्राटदाराची सुरू असलेली सर्व कामे तातडीने काढून घ्यावीत तसेच  महाराजांची अवहेलना करणाऱ्यांना शिक्षा व्हावी, अशी मागणीही  वडेट्टीवार यांनी केली आहे.
राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.  कंत्राटदाराने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. ही व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यात काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (Ravindra Chavan)

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. आमचं आणि साऱ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही! निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घाईघाईत बनवलेलं आणि मोदीजींच्या हस्ते उद्धाटन झालेलं छत्रपती शिवरायांचं मालवण इथलं स्मारक आज केवळ ८ महिन्यातच कोसळलं. मिंधे सरकारची कंत्राटदार धार्जिणी राजवट ह्याला कारणीभूत आहेच, पण त्याहूनही घातक अशी भाजपाची मानसिकता कारणीभूत आहे. आम्ही काहीही करु आणि त्यातून बिनधास्त सुटू असा अहंकार त्यांच्यात आहे. त्याच अहंकारापोटी महाराजांच्या स्मारकाचं गांभीर्य लक्षात न घेता घाईत ते बनवण्यात आलं. केवळ महाराजांच्या प्रतिमेचा वापर करण्याचा हेतू होता, त्यामुळे त्या स्मारकाच्या गुणवत्तेकडे लक्षच दिलं गेलं नाही. स्थानिकांचं म्हणणंही ऐकलं नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

(हेही वाचा – Mulund Swimming Pool ची दुरुस्ती आणि नवीन फिल्टरेशन प्लांट)

महाराजांचा पूर्णाकृती  पुतळा पुन्हा उभारणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दरम्यान, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे  महाराष्ट्राचे आराध्य दैवत  आणि  आमची अस्मिता आहे .हा पुतळा नौदलाने उभारला होता. त्याची संपूर्ण रचना नौदलाने केली होती . या घटनेबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी ४५ किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता. त्यामध्ये पुतळ्याचे नुकसान झाले. उद्या नौदलाचे अधिकारी येणार आहेत . पुन्हा तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती  पुतळा  दिमाखात उभा करण्याचे काम आम्ही करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात सांगितले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.