मंत्रालयात आता प्रवेशासाठी कडक सुरक्षा यंत्रणा; CM Devendra Fadnavis यांची घोषणा

जिल्हास्तरावरच समस्या सोडविण्यासाठी यंत्रणा

246
मंत्रालयात आता प्रवेशासाठी कडक सुरक्षा यंत्रणा; CM Devendra Fadnavis यांची घोषणा
  • प्रतिनिधी

मंत्रालयात प्रवेशासाठी आता कडक आणि काटेकोर सुरक्षा यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. मंत्रालयात येणार प्रत्येक माणूस आयडेंटीफाय होईल अशी सुरक्षा प्रणाली तयार करण्यात येणार आहे. मंत्रालयात दलालांचा सुळसुळाट असतो असा आरोप करण्यात येतो, त्यालाही यामुळे पायबंद बसणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. जिल्हापातळीवर सुटणाऱ्या तक्रारी जिल्हापातळीवरच सुटाव्यात त्यासाठी मंत्रालयात खेटे मारावे लागू नयेत यासाठी एक कार्यप्रणाली विकसित करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा – EPS Rule Tweak: आता देशभरात कुठल्याही बँक खात्यांमध्ये मिळणार पेन्शनची रक्कम)

मंत्रालयात आधीच्या काळात आत्महत्या, आंदोलने असे अनेक प्रकार घडले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी मंत्रालयाच्या मधल्या चौकात सुरक्षाजाळी देखील उभारण्यात आली. त्यावरही उड्या मारून आंदोलनांचे प्रकार घडले आहेत. याला पायबंद घालण्यासाठी आता कडेकोट सुरक्षा प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येकाचे फेशियल रिकग्नीशन देखील होणार आहे. मंत्रालयात येण्यासाठी प्रत्येकाला नोंदणी करावी लागणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले, ही नोंदणी ऑनलाईन देखील करता येणार आहे. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्या व्यक्तीचा प्रवेश पास तयार होईल, जाताना तो त्या व्यक्तीला परत करावा लागेल. यामुळे कोण किती वेळ मंत्रालयात फिरत होता हे स्पष्ट होणार आहे. मंत्रालयात दलालांचा सुळसुळाट असतो असा आरोप होतो त्याबाबतही स्पष्टता येणार आहे.

(हेही वाचा – Union Carbide चा विषारी कचरा तब्बल 40 वर्षांनंतर उचलला)

जिल्हास्तरावरच समस्या सोडविण्यासाठी यंत्रणा

मंत्रालयात येणाऱ्या ७० टक्के तक्रारी या जिल्हास्तरावर सुटणाऱ्या असतात. त्या घेऊन मंत्रालयात खेटे मारण्याची कोणावर वेळ येऊ नये यासाठी एक यंत्रणा उभारण्यात येईल. जेणेकरून या तक्रारी जिल्हापातळीवरच सुटाव्यात असेही मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.