ऑक्सफर्डमध्ये Mamata Banerjee यांच्या भाषणावेळी गोंधळ; आंदोलकांनी आरजी कर कॉलेज बलात्कार प्रकरणावरून दीदींना घेरले

100
ऑक्सफर्डमध्ये Mamata Banerjee यांच्या भाषणावेळी गोंधळ; आंदोलकांनी आरजी कर कॉलेज बलात्कार प्रकरणावरून दीदींना घेरले

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी दि. २७ मार्च रोजी लंडनमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या (University of Oxford) केलॉग कॉलेजमध्ये भाषण दिले. यावेळी त्यांच्या भाषणादरम्यान काही विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत आरजी कर कॉलेज (R G Kar Medical College) आणि घोटाळ्यांशी संबंधित मुद्दे उपस्थित केले. मात्र, मुख्यमंत्री ममता यांनी परिस्थिती सांभाळत निदर्शकांना उत्तर दिले.

( हेही वाचा : Crop Insurance : राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा! २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई मिळणार

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना या महाविद्यालयात महिला, मुले आणि समाजातील उपेक्षित घटकांच्या सामाजिक विकासावर बोलण्यासाठी लंडनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या (University of Oxford) केलॉग कॉलेजमध्ये बोलावण्यात आले होते. याच विषयावर भाषण देत असताना त्यांनी बंगालच्या ‘स्वास्थ्य साथी’ आणि ‘कन्याश्री’ योजनांचा संदर्भ देत दिले. यावेळी त्यांनी बंगालमधील गुंतवणुकीवर बोलायला सुरुवात करताच, काही लोक हातात फलक घेऊन उभे राहिले. यावर, राज्यातील निवडणुका आणि हिंसाचार तसेच आरजी करचा मुद्दा होता. यावेळी निदर्शकांनी घोषणाबाजीही केली. यावर, मुख्यमंत्र्यांनी मोजक्या शब्दांत उत्तर देत निदर्शकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा आंदोलकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रदर्शन करणाऱ्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री ममता म्हणाल्या, ‘माझा अपमान करून तुमच्या संस्थेचा अपमान करू नका.’ मी देशाची प्रतिनिधी म्हणून इथे आली आहे. तुमच्या देशाचा अपमान करू नका. मात्र, नंतर कार्यक्रमाच्या आयोजकांनी आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी आंदोलकांच्या विरोधात आवाज उठवला आणि त्यांना तेथून निघून जाण्यास भाग पाडले.”

जेव्हा आंदोलकांनी आरजी कराचा (R G Kar Medical College) मुद्दा उपस्थित केला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले, ‘थोडे मोठ्याने बोला, मला तुमचे बोलणे ऐकू येत नाही.’ तुम्ही जे सांगाल ते मी ऐकेन. पण तुम्हाला माहिती आहे का कि हे प्रकरण प्रलंबित का आहे? या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी आता केंद्र सरकारच्या हातात आहे, हे प्रकरण आता आमच्या हातात नाही.” असे म्हणत त्यांनी विषयांतर करण्याचा प्रयत्न केला.

तसेच ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) पुढे म्हणाल्या, ‘इथे राजकारण करू नका, हे राजकारणाचे व्यासपीठ नाही. माझ्या राज्यात या आणि माझ्यासोबत राजकारण करा.” असे थेट आव्हान त्यांनी यावेळी दिले. एकप्रकारे जाब विचारणाऱ्यांना त्यांनी धमकावले. दरम्यान यावेळी जेव्हा काही प्रेक्षकांनी ‘चले जाव’ असे नारे दिले तेव्हा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee ) आत्मविश्वासाने म्हणाल्या, “आपणच वारंवार मला येथे येण्यासाठी प्रोत्साहित केले. लक्षात असू द्या, दिदी कुणाचीही परवा करत नाही. दीदी रॉयल बंगाल टायगरसारखी चालते. जर तुम्ही मला पकडू शकत असाल, तर पकडा!” यानंतर तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट करत, “त्या (ममता बनर्जी) झुकत नाहीत. त्या डगमगत नाहीत, आपण त्यांना जेवढे अधिक टोकाल, त्या तेवढीच भयंकर गर्जना करतील. ममता बॅनर्जी एक रॉयल बंगाल टायगर आहेत,असे लिहलेले होते.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.