सुभाष देसाईंचा मुलगा भूषण देसाईंचा ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश

202

एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी शिवसेनेत बंड करून आता शिवसेनेवर नियंत्रण मिळवल्यावर उद्धव ठाकरे यांच्या गटातून निष्ठावंतही शिंदेंना येऊन मिळत आहेत. अनेक मंत्री आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व अमान्य असल्याचे सांगत शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला. मात्र लिलाधर डाके, मनोहर जोशी, सुभाष देसाई अशी जुनी मंडळी उद्धव ठाकरे यांच्याच सोबत आहेत; परंतु त्यांची पुढची पिढी नव्या विचाराच्या तयारीत आहे. कारण पुढच्या काही तासांत सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

सुभाष देसाई हे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, सुभाष देसाईंचा मुलगा भूषण देसाई आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार आहे. भूषण देसाई यांच्या निर्णयामुळे शिवसेनेतल्या फुटीनंतर आणखी एका घरात फूट पडल्याचे दिसून येत आहे. भूषण देसाई एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सुभाष देसाई यांनी सिंधुदुर्गमध्ये झालेल्या सभेत शिवसेनेत पडलेल्या फुटीवर भाष्य केले होते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बळ मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचे ते म्हणाले होते. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर सुभाष देसाई ठामपणे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. आता थेट सुभाष देसाईंच्या मुलाला आपल्या पक्षात शिंदे यांनी ठाकरेंना आणखी एक धक्का दिला आहे. खासदार गजानन किर्तीकर हे सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या गटात होते. ते सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात भूमिका मांडत होते. अखेर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर, त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.