गोवा येथील फ्रान्सिस झेविअर यांच्या शवाची डी.एन.ए चाचणी करण्याची मागणी हिंदु रक्षा महाआघाडीचे निमंत्रक प्रा.सुभाष वेलिंगकर (Prof. Subhash Velingkar) यांनी केली होती. त्याविरोधात ख्रिस्ती आंदोलकांनी आंदोलन पुकारले आहे. मात्र हिंदुत्वनिष्ठ संघटना प्रा. सुभाष वेलिंगकर (Prof. Subhash Velingkar)यांच्या पाठिंशी ठामपणे उभ्या राहिल्या आहेत. प्रा. वेलिंगकर (Prof. Subhash Velingkar)यांच्या समर्थनार्थ पर्वरी येथे दि. ६ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी येथील हिंदुत्वनिष्ठांनी फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाविषयी सत्य बाहेर येण्याविषयी सर्वेाच्च न्यायालयात जाण्याची चेतावणी दिली.
धार्मिक सलोखा बिघडवू पहाणार्यांच्या कृत्याला शासनाने बळी पडू नये!
दरम्यान प्रा. सुभाष वेलिंगकर यांना समर्थन देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते दि. ५ ऑक्टोबरला डिचोली पोलिस ठाण्यात जमा झाले. मुळात प्रा. वेलिंगकर (Prof. Subhash Velingkar)यांनी फ्रान्सिस झेवियर यांच्यासंबंधी केलेले विधान हे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्यासाठी केलेले विधान नव्हते. इतिहास सर्वांच्या समोर यावा, हा या मागणी मागील मूळ हेतू होता. त्यामुळे राज्यातील धार्मिक सलोखा बिघडवू पहाणार्यांच्या कृत्याला शासनाने बळी पडू नये आणि शासनाने सत्य इतिहास पुढे आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. धार्मिक सलोखा बिघडवण्यासाठी राजकीय पक्ष सक्रीय झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community