वनविभाग मिळवण्याच्या स्पर्धेत मुनगंटीवार यांची बाजी

143

गेल्या दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी अखेर मंत्रीमंडळाचा विस्तार जाहीर झाला. वनविभाग मिळवण्यात माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पुन्हा एकदा यशस्वी झाले आहेत. नव्या सरकारच्या निर्मितीनंतर गेल्या सरकारच्या काळात वादग्रस्त ठरलेले माजी वनमंत्री संजय राठोड आणि त्याअगोदर वनमंत्री राहिलेले सुधीर मुनगंटीवार यांच्यात पुन्हा वनविभाग मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरु होती. अखेर मुनगंटीवार यांना पुन्हा वनविभागाचे मंत्री म्हणून काम पाहता येणार आहे. याबाबत ४ ऑगस्ट रोजी हिंदूस्थान पोस्टने दिलेली बातमी खरी ठरली आहे.

दोघांच्या रस्सीखेचात राठोड यांच्यापेक्षाही सुरुवातीपासूनच मुनगंटीवार यांचे नाव जास्त प्राधान्यक्रमाने घेतले जात होते. वन्यजीवप्रेमी वर्तुळात तसेच वनाधिका-यांनाही मुनगंटीवारच पुन्हा वनविभागाचे वनमंत्री म्हणून परततील, अशी आशा होती. अखेर रविवारी त्यांच्या नावावरच शिक्कामोर्तब झाले. मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात वृक्षारोपणाच्या राज्यव्यापी मोहिमेमुळे वनविभागाला अतोनात प्रसिद्धी मिळाली होती. त्यामुळे आता आगामी १८ संवर्धित वनक्षेत्रांच्या बाबतीत मुनगंटीवार सकारात्मक निर्णय घेतील, अशी आशा वन्यजीवप्रेमी व्यक्त करत आहे. त्यापैकी १८व्या संवर्धित क्षेत्राबाबत मात्र मोठ्या स्तरावर विरोध होत आहे. नव्या राज्य वन्यजीव मंडळाच्या सदस्यांची निवडणूक आली आहे.

( हेही वाचा: Independence Day : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी दिले पाच संकल्प!) 

मानद वन्यजीव रक्षकांची यादी बदलली

राज्यातील वनविभागाला वन्यप्राण्यांच्या संरक्षणार्थ काम करणारे मानद वन्यजीव रक्षक या अशासकीय सदस्यांच्या पदावर नव्या नियुक्त्या होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. वनविभाग आणि समाज यांचा दुवा म्हणून काम करणारे मानद वन्यजीव रक्षक म्हणून वनविभागाला साहाय्य करतात. मानद वन्यजीव प्रत्येक जिल्हानिहाय नियुक्त केले जातात. किमान तीन वर्ष मानद वन्यजीव रक्षकांचा कार्यकाळ असतो. आता वर्षभराच्या आतच मानद वन्यजीव रक्षक बदलले जात आहेत. त्याकरता नावेही वनविभागाने मागवली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.