राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली मुलाखत झाली. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. 26 जुलैला त्याचा एक भाग प्रदर्शित झाला. त्यावर भाजपकडून सडकून टीका करण्यात आली. आता यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या मुलाखतीतील मुद्दे खोडून काढले आहेत. ठाकरेंनी शिंदे गटाला बाळासाहेबांऐवजी तुमच्या वडिलांच्या नावाने मत मागा, असे म्हणत बंडखोरांना पु्न्हा एकदा सुनावलं. त्यावर 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचे वडील होते का, असा सवाल मुनगंटीवारांनी विचारला आहे.
सुसंस्कृत विरोधी पक्ष हवा असं तुम्ही म्हणता, मग तेच सिद्ध करण्याची वेळ आली आहे. शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हणण्यापेक्षा सुसंस्कृत विरोधी पक्ष म्हणून भूमिका पार पाडा, असेही मुनगंटीवार म्हणाले.
( हेही वाचा: तेव्हा तुमचे वडील नरेंद्र मोदी होते का? मुनगंटीवारांचा ठाकरेंवर घणाघात )
Join Our WhatsApp Community