कोरोनाच्या प्रभावानंतर होणाऱ्या अर्थसंकल्पातून थांबलेले अर्थचक्र सुरु होईल, अशी अपेक्षा होती, पण अर्थमंत्री अजित पवार यांनी संधी गमावली. यातील तरतुदी म्हणजे मंदिरातील प्रसाद नाही, जो येईल त्याच्या हातात दिला, तर अर्थसंकल्पातून भविष्यातील योजना दिसल्या पाहिजे. या अर्थसंकल्पाचे वर्णन करायचे झाल्यास, ‘कसे म्हणावे यास बजेट, मागचेच मांडले सारे थेट, किती लावले दिवे बुडाशी लपतो का अंधार, हे कसले सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार, अशा शब्दांत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
एक घास चिऊचा, एक घास काऊचा…
अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी घेताना मुनगंटीवार बोलत होते. लहानपणी गोष्ट सांगितली जायची एक घास चिऊचा, एक घास काऊचा…बजटमध्ये असे काही आहे का? एक वर्ष काँग्रेसचे, एक वर्ष राष्ट्रवादीचे, एक वर्ष शिवसेनेचे. तीन वर्षे आपण दिले त्याचे काय केले, असेही आमदार मुनगंटीवार म्हणाले.
(हेही वाचा तर 2040 मध्ये भारताचा पंतप्रधान मुसलमान असेल! रणजित सावरकरांनी दिला धोक्याचा इशारा)
२५ आमदारांची यादी मला द्यावी
राज्य संकटात आहे, तर नुसत्या घोषणा केल्या, एक कविता आहे, गणपतरावांनी बिडी पिताना चावायचाच नुसतीच काडी, मनाशीच अन म्हणायचा की, या जागेवर बांधीन माडी, या पद्धतीचे वर्तन या सरकारचे आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडील २५ आमदारांची यादी मला द्यावी आम्ही सरकार कसे चालवायचे हे दाखवून देऊ, अशा खोचक टोला हाणला.
हे सरकार शरमप्रूफ
पेट्रोल-डिझेलच्या माध्यमातून हे सरकार ५० रुपये घेते आणि सूट देताना केंद्राकडे बोट दाखवता, हे सरकार शरमप्रूफ आहे, शेतकऱ्यांची फसवणूक करता, तरतूद करता आणि पैसे देत नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community