Mohammad Ali Jina Hindu : जीना यांचेही पूर्वज हिंदूच होते – मुनगंटीवार

मलाही माहीत नव्हते की बॅरिस्टर मोहम्मद अली जीना यांचेही पूर्वज हिंदूच होते हे मला एक पुस्तक वाचले त्यातून कळले,” असे मुनगंटीवार म्हणाले.

186
Mohammad Ali Jina Hindu : जीना यांचेही पूर्वज हिंदूच होते - मुनगंटीवार
Mohammad Ali Jina Hindu : जीना यांचेही पूर्वज हिंदूच होते - मुनगंटीवार

हिंदुस्थान-पाकिस्तान फाळणीला जबाबदार असणाऱ्या बॅरिस्टर मोहम्मद अली जीना यांचे पूर्वजदेखील हिंदू होते, असे विधान राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी (१५ डिसेंबर) केले. मुनगंटीवार यांनी नागपूर येथील पत्रकारांच्या निवासस्थानी भेट दिली आणि अनौपचारिक चर्चा करत असताना त्यांनी वरील विधान केले. (Mohammad Ali Jina Hindu)

यावेळी एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाजाला एकत्र घेऊन चालत. मात्र आज तसे चित्र दिसत नाही. त्यावर मुनगंटीवार म्हणाले, “असे अनेक जण देशात आहेत ज्यांच्यावर पुर्वी अत्याचार केला गेला आणि ते आज मुसलमान आहेत. (Mohammad Ali Jina Hindu)

कदाचित तुमच्यावरही असे अत्याचार झाले असतील म्हणून तुम्हाला आज हा प्रश्न विचारावसा वाटत असेल. ‘मलाही माहीत नव्हते की बॅरिस्टर मोहम्मद अली जीना यांचेही पूर्वज हिंदूच होते हे मला एक पुस्तक वाचले त्यातून कळले,” असे मुनगंटीवार म्हणाले. (Mohammad Ali Jina Hindu)

(हेही वाचा – Dadar Hawkers : दादरच्या फेरीवाल्यांना दादरकरांचेच संरक्षण, इमारतींसह मार्केट आणि दुकानांमध्ये ठेवले जाते साहित्य)

संभाजी महाराजांवर अत्याचार

“जसे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर तब्बल ४० दिवस अनेक अत्याचार केले गेले. त्यांचे डोळे काढले गेले, डोक्यावरचे केस उपटले गेले, त्वचा सोलली, डोळ्यात गरम सळ्या घुसवण्यात आल्या असं कधी झालंय का या देशात?,” असे मुनगंटीवार म्हणाले. (Mohammad Ali Jina Hindu)

रावणाला दर वर्षी जाळतो मग आम्ही हिंदू विरोधी आहोत का?

“औरंगजेब, अफझलखान हे खूपच लुच्चे लफंगे, बदमाश होते. ते खूप अत्याचार करायचे. त्यामुळे ते आमचे आदर्श नाहीत. आम्ही तर रावणाला दरवर्षी जाळतो. तो तर प्रकांड पंडित हिंदू होता. तरीही आम्ही रावणाला दर वर्षी जाळतो मग आम्ही हिंदू विरोधी आहोत का? कारण तो हिंदू असला तरी वाईट मार्गावर चालत होता आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वाईट मार्ग अवलंबल्याचा आदर्श कधीही घेतला नाही. औरंगजेब आणि अफजलखानाला दरवर्षी आम्ही जाळत तरी नाही, असे ते पुढे म्हणाले. (Mohammad Ali Jina Hindu)

(हेही वाचा – Vikasit Bharat Sankalp Yatra : विकसित भारत संकल्प यात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास; शासकीय योजनांचा गावोगावी जागर)

अब्दुल कलाम आदर्श

आणखी एक उदाहरण देताना मुनगंटीवार म्हणाले, “चंगेज खानन कधीच युद्ध हरला नाही तरीही आम्ही त्याचा आदर्श घेत नाही. तैमुरलंग याने एक लाख मानवी कवट्या वापरून राजमहल बनवला तोही आमचा आदर्श नाही. मात्र अब्दुल हमीद ज्याने आपले संपुर्ण जीवन देशासाठी समर्पित केले. त्याच्यासाठी या देशाने, आपल्या आर्मीने कायदा बदलला, तो आमचा आदर्श आहे. (Mohammad Ali Jina Hindu)

दुसरे मिसाईलमॅन म्हणून ओळखले जातात ते एपीजे अब्दुल कलाम त्यांना फक्त राष्ट्रपतीच नाही बनवलं तर देश त्यांना डोक्यावर घेऊन नाचला, ते आमचे आदर्श आहेत. या देशातील लोक जातीवादी आहेत असे प्रश्न निर्माण करणारे तुमच्या डोक्यात निर्माण करून देणारे लाचार आहेत त्यांना या देशाबद्दल प्रेम नाही, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला. (Mohammad Ali Jina Hindu)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.