शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत जातील किंवा त्यातील काही पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar) हे पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाणार नाहीत, असं देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले. (Sudhir Mungantiwar)
पवारांना राष्ट्रवादीच्या भवितव्याची कल्पना आहे
“लोक माझे सांगती हे शरद पवारांचं आत्मचरित्र वाचलं तर त्यांचं राजकारण ताडजोडीचं आणि सत्तेच्या स्वार्थाचं राजकारण राहिलेलं आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधींवर टिप्पणी करताना त्यांनी 15 मे 1999 रोजी विदेशी मुळाचा मुद्दे घेत टीका केली होती. पण काही महिन्यानंतर ते काँग्रेससोबत गेले. दिवंगत काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी म्हणाले होते की, सोनिया गांधी पवारांवर विश्वास ठेवत नव्हत्या. पवारांना आज हे म्हणायची गरज का लागली? त्यांना राष्ट्रवादीच्या भवितव्याची कल्पना आहे.” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. (Sudhir Mungantiwar)
… म्हणून अजितदादा परत जाणार नाहीत
“राष्ट्रवादीचा आधार असलेले अजितदादा आज त्यांच्यासोबत नाहीत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांनी अजितदादांना खूप दुखावलं, प्रचाराचा स्तर खाली गेला, म्हणून अजितदादा परत जाणार नाहीत. आताची शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे, शिवसैनिकांची नाही, आताची राष्ट्रवादी पवारांच्या नावाने आहे. इतिहासात कधी नावाने पक्ष नव्हते, हे पक्ष नावाचे झालेत कार्यकर्त्यांचे राहिले नाहीत.” अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. (Sudhir Mungantiwar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community