कर्नाटकामधील काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा विधानसभेतून हटवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजकीय वर्तुळात कर्नाटक सरकारच्या या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मुळात २०२२ मध्ये बसवराज बोम्मई यांच्या सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांची (swatantra veer savarkar) प्रतिमा लावण्याचा निर्णय घेतला होता. यावरून आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, भाजप आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. अशातच भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी (Sudhir Mungantiwar) काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारवर टीका केली आहे.
( हेही वाचा : माजी नगरसेवक Prabhakar Shinde यांचा बेस्टला इशारा; अपघाताच्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, तर… )
यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, कर्नाटक सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत गंभीर आहे. कर्नाटक सरकारला याचा हिशोब द्यावा लागेल. ज्यांनी-ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. ते-ते एकतर पराभूत झालेत किंवा बुडालेत. त्यामुळे आता पुढचा नंबर कर्नाटकातील काँग्रेसच्या सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांचा आहे. मी हे विश्वासाने सांगतोय आज लिहून घ्या. पुढील निवडणुकीत कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांचा पराभव होईल. कारण त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आहे, अशी टीका सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली आहे.
हेही पाहा :