Sudhir Mungantiwar : ती वाघनखं छत्रपती शिवरायांचीच? सुधीर मुनगंटीवार म्हणाले…

88
Sudhir Mungantiwar : ती वाघनखं छत्रपती शिवरायांचीच? सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
Sudhir Mungantiwar : ती वाघनखं छत्रपती शिवरायांचीच? सुधीर मुनगंटीवार म्हणाले...

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पुढील आठवड्यात १९ जुलै रोजी ही वाघनखं साताऱ्यातील संग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याचंही सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी गुरूवारी विधानसभेत जाहीर केलं. मात्र, लंडनच्या संग्रहालयात ठेवण्यात आलेली वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याबाबत दावे करण्यात आले आहेत. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी याबाबत पत्रकार परिषदेत भूमिका मांडली होती. त्यावरून चर्चा सुरू असताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत याबाबत निवेदन सादर केलं.

(हेही वाचा –Shivani Raja : ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणीने गीता घेत घेतली खासदारकीची शपथ)

सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, “अनेक शिवभक्तांची मागणी होती की, अफजलखानाच्या कबरीजवळचं अतिक्रमण हटवावं. ५ नोव्हेंबर २०२२ रोजी या दिवशी ते हटवण्याचा निर्णय झाला. १० नोव्हेंबर रोजी ते अतिक्रमण हटवलं. त्यानंतर शिवभक्तांनी वाघनखांची माहिती दिली. आपण त्यासंदर्भातला पत्रव्यवहार सुरू केला. ती वाघनघं शिवभक्तांच्या दर्शनासाठी द्यावीत असा पत्रव्यवहार पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्रिटनचे पंतप्रधान आणि त्या संग्रहालयाच्या प्रमुखांशी केला. त्यांचं उत्तर आलं. १८२५ रोजी बनवलेल्या डबीत ही वाघनखं ठेवली आहेत. त्या चित्रासह त्यांनी सर्व माहिती पाठवली.” असं सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

(हेही वाचा –Andheri Flyover : पश्चिम द्रुतगती मार्गावरील अंधेरी उड्डाणपूल अधांतरीच, नक्की पूल कुणाच्या ताब्यात?)

“आम्ही माहिती घेतली की, यासंदर्भात जगात इतरत्र कुठे काही उपलब्ध आहे का? इतर ठिकाणच्या पुराव्यांमध्येही माहिती देण्यात आली आहे. ही वाघनखं लंडनला गेल्यानंतर ब्रिटनमध्ये प्रदर्शनातही ठेवण्यात आली होती. १८७५ व १८९६ साली ही प्रदर्शनं भरवण्यात आली. त्यासंदर्भात तेव्हाच्या वर्तमानपत्रांतही बातम्या आल्या. त्यानुसार ही वाघनखं त्या संग्रहालयात असल्याचं सांगण्यात आलं. आपला पत्रव्यवहार पाहिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा वर्षभरासाठी ही वाघनखं दर्शनासाठी देऊ असं सांगितलं. पण आम्ही पुन्हा प्रयत्न केला. त्यानंतर तीन वर्षांसाठी वाघनखं आपल्याकडे राहतील असा निर्णय झाला. १९ जुलैला हे वाघनख साताऱ्याच्या सरकारी म्युझियममध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व तिथले सरदार यांच्या उपस्थितीत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.” अशी माहिती सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.