छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील बछड्यांचा नामकरण सोहळा आज पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवर उपस्थित होते. या वेळी बछड्याच्या नामकरणासाठी काढण्यात आलेल्या चिठ्ठीत आदित्य नाव आल्याने बछड्याच्या नामकारण सोहळ्यालाही राजकीय रंग आल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी ठरवलेल्या नावांच्या चिठ्ठीमध्ये ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी होती. नामकरणाच्या वेळी काढण्यात आलेल्या चिठ्ठ्यांमध्ये ‘आदित्य’ या नावाची सापडली. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी या नावाला विरोध करून दुसरे नाव ठेवण्यास सांगितले.
(हेही वाचा – Indian Navy : भारतीय नौदलाला लवकरच मिळणार एआय कमांडर, चीनचे होणार गर्वहरण)
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातलील पांढरी वाघीण अर्पिता हिने 7 स्पटेंबर रोजी पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला होता. आज सिद्धार्थ उद्यानात जन्मलेल्या या बछड्यांचा नामकरण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी लोकांनी पाठवलेल्या नावांची चिठ्ठी टाकून हे नामकरण करण्यात आले. मात्र, त्याचवेळी मुख्यंमत्री शिंदे यांनी काढलेल्या चिठ्ठीत ‘आदित्य’ हे नाव आलं. परंतु, लगेचच मुनगंटीवार यांनी हे नाव मागे घ्या, असे म्हटले. त्यामुळे आदित्य नाव न ठेवता ‘कान्हा’ नाव ठेवलं गेलं. त्यामुळे बछड्यांच्या नामकरण सोहळ्यात देखील राजकारण पाहायला मिळाले.
राजकीय प्रतिक्रिया…
यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ‘जंगलामध्ये राहणाऱ्या वाघाच्या बछड्यांना नाव दिलं जात नाही. असे नाव फक्त उद्यानामध्ये जन्मलेल्या वाघांना दिले जाते, पण कोणतेही नाव देताना वाद निर्माण होऊ नयेत हेदेखील पाहिले पाहिजे.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community