एका बाजूला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देणारा निर्णय समोर आला आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने दिले आहेत. या निर्णयानंतर एकनाथ शिंदेंच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे.
( हेही वाचा : आदित्य ठाकरेंना सरकारचा मोठा धक्का: वांद्रे-माहिम किल्ल्यापर्यंतचा सायकल ट्रॅक प्रकल्प केला रद्द )
ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक अभिनंदन – सुधीर मुनगंटीवार
“शिवसेना” पक्ष आणि “धनुष्यबाण ” निवडणूक चिन्ह यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हक्क असल्याचा ऐतिहासिक निर्णय आज केंद्रीय निवडणुक आयोगाने दिला आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आज सत्याचा पुन्हा एकदा विजय झाला आहे. केवळ घराणेशाहीच्या जोरावर भारतीय लोकशाहीतील राजकीय पक्ष ताब्यात ठेवता येणार नाहीत असा हा स्पष्ट संकेत निवडणूक आयोगाने दिला आहे. पक्षांतर्गत लोकशाही बळकट करणारा हा निर्णय भारताच्या लोकशाहीला बळकटी देणारा, काही राजकीय पक्षांवर असलेली काही कुटुंबांची पकड ढिली करणारा आहे. या निर्णयामुळे भारतीय राजकारणातील एका मोठ्या स्वच्छता पर्वाला सुरूवात झाली आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. अशी प्रतिक्रिया भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांनी दिली असून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.
दोन्ही शिंदे गटाला मिळाल्याबद्दल अभिनंदन – नारायण राणे
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे पक्षाचे शिवसेना नाव व धनुष्यबाण निशाणी हे दोन्ही शिंदे गटाला मिळाल्याबद्दल अभिनंदन असे ट्वीट करत नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.
Join Our WhatsApp Community