देशातील दोन निशाण, दोन संविधान आणि दोन प्रधानाला विरोध करणाऱ्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बलिदान सहजसोपे नव्हते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यामुळेच आज काश्मीर भारतात आहे. त्यामुळे त्यांचा त्याग व बलिदान कधीही विस्मरणात जाऊच शकत नाही, असे मत राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले की, भाजपाने नेहमीच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि देशप्रेमाचे स्मरण केले आहे आणि भविष्यात करीत राहणार आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत डॉ. मुखर्जी यांनी देशाच्या अखंडतेबाबत आग्रही भूमिका घेतली होती. काश्मीरमध्ये अत्यंत प्रतिकुल परीस्थितीत त्यांनी देशाच्या अखंडतेसाठी आंदोलन केल्याचे स्मरण मुनगंटीवार यांनी करून दिले. भारतरत्न, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध होता. सत्तेच्या लालसेपोटी हा विरोध कायम होता अशी टीकाही त्यांनी केली.
सत्तेच्या लालसेपोटी देशाचे विभाजन करणाऱ्या काँग्रेसने काश्मीर, हैदराबाद आणि जुनागढ या तीन देशांतर्गत संस्थानामुळे डोकेदुखी वाढवली होती. पंडित नेहरू यांना पंतप्रधान व्हायची इतकी घाई झाली होती, की त्यांनी त्या घाईच्या भरात अनेक निर्णय चुकीचे घेतले आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ऐवजी नेहरू यांनी स्वत:कडे पंतप्रधानपद घेतले. त्यानंतरही सरदार पटेल आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशाच्या अखंडतेसाठी कडवी झुंज दिली. या दोन कणखर नेत्यांमुळेच देशाचे अखंडत्व कायम राहिल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
(हेही वाचा – Mumbai Police : ‘आप मुझे दो लाख दो, मै बॉम्बब्लास्ट रुकाऊंगा’, मुंबई पोलिसांकडेच मागितली खंडणी )
काँग्रेसचे राजकारण देशासाठी घातक
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी नसते, तर काश्मीर कदाचित भारतात राहिले नसते. त्यामुळे काश्मीरसाठी मुखर्जी यांचे बलिदान मोठे आहे. काँग्रेसने कलम ३७०चा डाव टाकत काश्मीरचे घोंगडे भीजत ठेवले . त्यामुळे अनेक वर्षे देशाला मनस्ताप सहन करावा लागला. देशातील दहशतवाद वाढला. सुमारे ७० वर्षांपर्यंत हे कलम लागू ठेवण्यात आले. त्यामुळे काँग्रेसचे राजकारण हे देशासाठी घातक असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त काँग्रेस आणि त्यांच्यासारख्या पक्षांना धडा शिकविण्याची वेळ आता आली आहे आणि हा धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा संकल्प प्रत्येकाने करावा, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community