उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा, पाटणकरांची चौकशी होऊ नये म्हणून त्यांनी राजीनामा दिला; शिवसेनेच्या आमदाराचे खळबळजनक आरोप

72

उद्धव ठाकरेंनी मालेगाव सभेदरम्यान नाव न घेता शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. या टीकेला आता सुहास कांदे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंची नार्कोटेस्ट करा म्हणजे कोणत्या कंपनीकडून त्यांनी किती पैसे घेतले आहेत हे कळेल असा घणाघाती आरोप शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

( हेही वाचा : सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत! )

फक्त टोमण्यांची सभा होती – सुहास कांदे 

उद्धव ठाकरेंनी जनतेसाठी नाही तर श्रीधर पाटणकर यांची चौकशी होऊ नये म्हणून राजीनामा दिला असा खळबळजनक आरोप सुहास कांदे यांनी केला आहे. त्यांची नार्को टेस्ट करा म्हणजे हे सगळं सत्य बाहेर येईल असेही सुहास कांदे म्हणाले. पुढे ते म्हणाले की, “ठाकरेंची सभा फक्त टोमण्यांची सभा होती. या सभेत तरुणांना कोणतेही नेतृत्व केले नाही, शेतकऱ्यांना दिशा देणारी सभा नव्हती. सभा पाहून बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून मला उद्धव ठाकरेंची दया आली.”

सुहास कांदेंचे जाहीर आव्हान 

उद्धव ठाकरेंनी केलेल्या ५० खोक्यांच्या आरोपावर सुहास कांदे म्हणाले, उद्धव ठाकरेंना माझी विनंती आहे की, आपण आता भावनेचे राजकारण बंद करावे मी उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान करतो की, आम्ही खोका सोडा एक रुपया घेतला असेल तर आमची नार्को टेस्ट करा ती सुद्धा जाहीरपणे कॅमेरे लावून टेस्ट करा. ज्यांनी बाळासाहेबांना शिव्या दिल्यात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला, त्याच भुजबळांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले. मग आम्ही कोणाकडे पाहायचे? असा संतप्त सवाल यावेळी सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.