मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न, मराठा आंदोलक सहाव्या माळ्यावर पोहचले

142
सध्या राज्यात विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु असताना दुसरीकडे मंगळवारी, २३ ऑगस्ट रोजी एकाने मंत्रालयाच्या छतावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन ते तीन जण मंत्रालयाच्या छतावर चढले होते. त्यांचा आत्महत्येचा प्रयत्न होता. परंतु पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुखरुपपणे खाली उतरवले.

आंदोलक अनेक दिवसांपासून मंत्रालयात चकरा मारायचे 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सभागृहात प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन ते तीन जण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्रालयाच्या छतावर चढले होते. आता त्यांना खाली उतरवण्यात आले असल्याची माहिती  दिली. दरम्यान आमदार निलेश लंके आणि एका मराठा समन्वयकाने दिलेल्या माहितीनुसार विविध विभागातील भरती प्रक्रियेत सहभागी झालेले काही विद्यार्थी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या मागण्यासाठी मंत्रालयात चकरा मारत आहेत. आज त्यांना अधिकाऱ्यांनी चुकीची वागणूक दिल्याने त्यांचा संताप अनावर झाला आणि ते मंत्रालयाच्या छतावर चढले. शेवटी त्यांची समजूत काढून त्यांना खाली उतरवण्यात आले, पण मुलांना चुकीच्या पद्धतीने, जातीवादी दृष्टीकोनातून वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आता मराठा समन्वयक करत आहेत. मुलांचा जीव वाचवण्यात आम्ही यशस्वी ठरले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.