त्याची शेवटची इच्छा होती विमान बघण्याची…छत्तीसगडहून आलेल्या तरुणाची मुंबईत आत्महत्या

172

“मै खुदकुशी कर रहा हू, मेरी आखरी ख्वाईश हवाई जहाज देखने कि थी, मृत्यूपूर्वी त्याने हातावर पेनाने लिहून आपली शेवटची इच्छा व्यक्त करून आत्महत्या केल्याची घटना कुर्ला पूर्व येथे मंगळवारी उघडकीस आली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाची ओळख पटवण्यात आली असून हा तरुण छत्तीसगड येथून दोन दिवसापूर्वीच मुंबईत आलेला होता, याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

( हेही वाचा : MPSC मार्फत ८ हजार १६९ पदांसाठी मेगाभरती! अर्ज करण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ)

लक्ष्मी यादव (२२) असे या तरुणाचे नाव आहे. लक्ष्मी हा मूळचा छत्तीसगड राज्यातील तरुण असून तेथून तो बेपत्ता असल्याचे समोर आले आहे, मंगळवारी सकाळी लक्ष्मी यादव या तरुणाचा मृतदेह कुर्ला पूर्व येथील कुरेशी नगर येथून पश्चिमेला जाणाऱ्या पुलाच्या खाली गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. चुनाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला असता त्याच्या डाव्या हातावर त्याने मृत्यूपूर्वी पेनाने “मै खुदकुशी कर रहा हू, मेरी आखरी ख्वाईश हवाई जहाज देखने कि थी, असे लिहून ठेवले होते.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी लोकमान्य टिळक रुग्णालय येथे पाठवला असून या तरुणाच्या खिशात मिळालेल्या आधारकार्डवरून त्याची ओळख पटविण्यात आली असून पोलिसांनी छत्तीसगड पोलिसांशी संपर्क साधून लक्ष्मी यादव या तरुणाच्या आत्महत्येची माहिती देण्यात आली आहे. छत्तीसगड पोलिसांच्या मार्फत लक्ष्मी यादव याच्या कुटुंबियांना कळविण्यात आले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.