अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्याने सुजय नाराज होऊ नको, आपण लढणारे आहोत, पुन्हा लढू, पुन्हा जिंकू, आपण लढणारे आहोत, रडणारे नाहीत, आम्ही जिंकलो तिथे मशीन हॅक केले आणि ते जिंकले ते योग्य झाले, असे कुठे असते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील (Former MP Sujay Vikhe Patil) यांना म्हटले आहे.
एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, हा तात्पुरता व आसुरी आनंद विरोधकांना घेऊ द्या, विधानसभेत त्यांना समजेल महायुतीच सत्तेवर येऊ. प्रत्येक निवडणुकीतून शिकले पाहिजे, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
(हेही वाचा – Terrorist Search Operation: काश्मिरातील उरीत दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरूच, अधिकाऱ्यांनी सांगितले…)
दराडेंच्या मागे उभे रहा…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, किशोर दराडे अभ्यासू आहेत. दराडे यांच्या पाठीशी उभे राहा व त्यांना निवडून द्या. शिक्षकाचा सन्मान केला पाहिजे म्हणून आपण जुनी पेन्शन योजना सुरू केली, मात्र त्याला विरोध झाला. त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही निश्चित काम करणार आहोत. दुधाचा निर्णय आम्ही घेतला. काही ठिकाणी अंमलबजावणी झाली, तर काही ठिकाणी नाही झाली, मात्र आता आगामी काळात अधिवेशनात याबाबतीत निर्णय घेतला जाईल. शिक्षकाला फक्त शिकविण्याचे काम मिळाले पाहिजे यासाठी आम्ही सकारात्मक आहोत.
विखे कुटुंबाची भूमिका महत्त्वाची
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मला कुठे बोलावले की मी जात असतो. मी सर्वसामान्य मुख्यमंत्री आहे. सहकाराचे बीज रोवण्यात विखे कुटुंबाची भूमिका महत्त्वाची आहे. लोकसभेतील निकालावरून आपल्याला काही बोध घेण्याची निश्चित गरज आहे. जिल्ह्यातील दोन्ही जागांवर खोटे नेरेटीव्ह केल्याने आम्हाला फटका बसला. मोदी हटाव बोलले, पण ते म्हणणारेच हटले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community