ED : पाटकर आणि डॉ. किशोर डिसुले यांना २७ जुलैपर्यंत ईडी कोठडी

138
कोविड जम्बो सेंटर घोटाळा प्रकरणी ईडीकडून गुरुवारी, २० जुलै रोजी अटक करण्यात आलेल्या सुजित पाटकर आणि डॉ. किशोर डिसुले यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांना २७ जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
मुंबई महानगरपालिका कोविड जम्बो सेंटर घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांचे जवळचे मित्र सुजित पाटकर आणि डॉ. किशोर डिसुले यांना अटक केली. या दोघांना ईडीच्या अधिकारी यांनी विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांना २७ जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
डॉ. डिसुले हे महामारीच्या काळात दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचे प्रभारी होते. लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस (एलएचएमएस) ला दहिसर येथील कोविड हॉस्पिटलसाठी कंत्राट मिळाले आणि बीएमसीकडून ३० कोटी रुपयांचे पेमेंट मिळाले, परंतु प्रत्यक्ष कामासाठी केवळ ८ कोटी रुपये वापरले गेले.
कोविड-१९ च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबई मनपाने महामारीच्या काळात मुंबईत अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभे करण्यात आले होते. रुग्णालय मॅनेजमेंटशी संबंधित बहुतेक कंत्राटे राजकीय संबंध असणाऱ्यांना अधिकाऱ्यांनी वाढत्या किमतीत दिल्याचा आरोप आहे. पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या निर्देशानुसार आणि त्यांच्या वरिष्ठांनी दहिसर येथील जम्बो सेंटरच्या व्यवस्थापनासाठी एलएचएमएसला कंत्राट काम दिले. मनपाने एलएचएमएसला ३० कोटी रुपये दिले होते. एलएचएमएसने उर्वरित २२ कोटी रुपये शेल कंपन्या आणि इतर विविध कंपन्यांच्या खात्यांमध्ये वैयक्तिक वापरासाठी वळवले.
ईडीने मनी ट्रेल स्थापित केल्याचा दावा केला आहे. एलएचएमएसची स्थापना शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांचे जवळचे मित्र सुजित पाटकर यांनी २०२० मध्ये केली होती आणि एका महिन्याच्या आत कोविड हॉस्पिटलचे व्यवस्थापन करण्यासाठी मनपाकडून अनुभव नसतानाही करार केला होता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.