Sunanda Pawar : “पवार कुटुंब पुन्हा एकत्र…”, रोहित पवारांच्या आई नेमकं काय म्हणाल्या?

234
Sunanda Pawar :
Sunanda Pawar : "पवार कुटुंब पुन्हा एकत्र...", रोहित पवारांच्या आई नेमकं काय म्हणाल्या?

पवार कुटुंबातील सून आणि आमदार रोहित पवार यांची आई, सुनंदा पवार (Sunanda Pawar) यांनी परिवारातील अंतर्गत वादावर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीनंतर शरद पवार गट (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) गट असे दोन गट पडले आणि आरोप-प्रत्यारोपांच राजकारण सुरू झालं. झालं गेलं गंगेला मिळालं अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी घेतल्यामुळे आता पवार कुटुंबातील दरी सांधली जाईल का, पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल का असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात घोळू लागले आहेत. मात्र आमदार रोहित पवारांची आई आणि पवार कुटुंबातील सून, सुनंदा पवार (Sunanda Pawar) यांच्या बोलण्यावरून हे सध्या तरी शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुनंदा पवार काय म्हणाल्या ?

खरंतर इलेक्शनची जेव्हा घोषणा झाली आणि बारामतीमधील उमेदवाराची जेव्हा घोषणा झाली, त्याच्याआधीपासूनच आमचं कुटुंब खूप वेगळ्या मनस्थितीतून गेलं आहे. त्यामुळे विलक्षण तणाव होता. पण निवडणुकीला सामोरं जायचं होतं. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याआधीच आम्ही ठरवलं होतं की (शरद पवार) साहेबांच्या सोबत रहायचं. 70 टक्के कुटूंब साहेबांसोबत आहे आणि वैचारिक भूमिका बदलल्यामुळे एक कुटुंब बाजूला गेलं आहे. (Sunanda Pawar)

एरवी सण-समारंभाला एकत्र येणं ठीक आहे पण आता वैचारिक मतभेद एवढे झाले आहेत, मन एवढी दुखावली आहेत, भाषेचा स्तर खूप खाली गेला आहे, त्यामुळे जखमा खूप झालेल्या आहेत, त्यामुळे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणं शक्य नाही. अजितदादा ज्या भूमिकेच्या बाजूला गेलेत, ते अजितदादांना एकत्र येऊ देणार नाहीत. असं सुनंदा पवार (Sunanda Pawar) म्हणाल्या. रोहित पवारांवर आता पक्षाची मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे, अशी चर्चा आहे. रोहित ती नक्कीच पार पाडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Sunanda Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.